सादिक थैम:-वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील पांझुर्णी येथील श्री.सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान येथे ८ मे २०२५ रोजी मध्यरात्री दरम्यान दानपेटीतील रकमेची चोरी चोरट्यांकडून झाली तर दुसरी चोरीची घटना १५ मे २०२५ ला एकाच गावात मध्यरात्री दरम्यान मा भवानी मां गांगाई माता मंदिर पांझुरणी येथील दानपेटीतील रकमेची चोरी चोरट्यांनी केली. पहिल्या घटनेत अपराध क्र.३०६/२०२५,व अपराध क्र.३२०/२०२५ याप्रमाणे कलम ३३१(४),३०५(अ)भा.न्या. संहिता २०२३.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अज्ञात आरोपीविरुद्ध वरील कलमानव्ये पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते.सदर गुन्हे दाखल होताच वरोरा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून गोपनीय माहिती काढून आरोपी नामे १) प्रिनल सुरेश वर्भे वय २५ वर्ष ,धंदा मजुरी २)सूरज गजानन देवतळे वय २६ वर्ष,धंदा मजुरी दोन्ही राहणार माढेली, ता.वरोरा,जिल्हा-चंद्रपूर ह्या दोन्ही आरोपींना १६ मे २०२५ रोजी ताब्यात गुन्ह्यासंबंधी चौकशी केली असता,दोन्ही आरोपींनी चोरी केल्याचे कबूल केले त्यामुळे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एक मोटर- सायकल व नगदी रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर,अप्पर पोलीस अधीक्षक ,सहा.पोलीस पोलीस अधीक्षक तथा.पोलीस उपविभागीय अधिकारी वरोरा नयोमी साटम,पोलीस निरीक्षक.अजिंक्य तांबडे,यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी शरद भस्मे,पो.अ.संदीप मुळे,पो.अ.विशाल राजूरकर,पो.अ.मनोज ठाकरे यांनी केली.
0 comments:
Post a Comment