चंद्रपूर (Minor girl Rescue) : चंद्रपूर शहरात अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करणार्या आरोपीला आज दि. १३ मे रोजी चद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गोपनिय माहितीचे आधारे गौतम नगर येथे कारवाई करीत एका आरोपी महिलेला अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका केली. अमीना सैय्यद नावाची महिला महाकाली वार्डातील गौतम नगरात एका (Minor girl Rescue) अल्पवयीन मुलीकडून व्यापार करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी धाड टाकली.
याप्रकरणी शहर पोलिसांनी अमीना सैयद हिचे विरुध्द कलम १४३ (४) भारतीय न्याय संहिता सहकलम ३, ४, ५, ६ महिला व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, पोस्टे चंद्रपूर शहर यांचे नेतृत्वात पोउपनि संदीप, मपोहवा भावना रामटेके, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, संजय घोटे, नापोअं कपुरचंद खैरवार, पोअं इमरान खान, इरशाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, मपोअ सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment