Ads

पोलीस पाटलाच्या पतीस दोघांनी केली अमानुष मारहाण

Police Patla's husband was brutally beaten by two
ब्रम्हपुरी प्रतिनिधी :-तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सेवा सहकार सोसायटी च्या माध्यमातून गावा-गावात सुरु असलेल्या या वर्षी आधारभूत धान खरेदी केंद्रातील शेतकऱ्यांच्या धान खरेदीत पारदर्शकता असली तरी फसवणूक व तक्रारीच्या "भानगडीने" रणमोचन गावात मारहाणीचे रुद्ररूप घेतले असून त्यात एक इसम जखमी झाल्याने पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे तक्रार दाखल झाली.

पोलीस पाटील police patil असलेल्या महिलेचा पती श्री अधिकराव पिलारे धान विक्रीसाठी गावातील सेवा सहकारी संस्था येथे गेले असता, गावातीलच वैभव पुरुषोत्तम दोनाडकर व त्याचा सहकारी मंगेश दोनाडकर यांनी शुल्लक कारणावरून अधिकराव पिलारे यांना जुना असलेला वाद उकरून काढत शिवीगाळ केली व जबर मारहाण brutally beaten करीत "तू इथून चालता हो" म्हणून हाकलून लावले.

तालुक्यात रणमोचन गाव तसा वादग्रस्तच म्हणून परिचित, गावातील दोन व्यक्तीकडून गावातीलच व्यक्तीवर शुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीने आज दिवसभर रणमोचन आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी बंद होती व यामुळे गावातील वातावरण तापलेले होते सदर घटनेची तक्रार जखमी अधिकराव पिलारे यांनी पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे केली असून हल्ला करणाऱ्यां दोन्ही व्यक्तीवर कलम 323,504,506 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment