चंद्रपूर : दुचाकी वाहनचालकांच्या अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली आहे. पहिल्या टप्प्यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांसह खाकी वर्दीत असणाऱ्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या दरम्यान 17 पोलिसांवर व 8 इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 500 रुपयांचा दंड त्यांच्याकडून आकारण्यात आलाय. या कारवाईमुळं नागरिकही अवाक् झाले आहेत. जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत आहे. अपघातात मृत्युमुखी पडण्याऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अपघाताला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनातून वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी हेल्मेटसक्ती केली आहे. हेल्मेटसक्ती तीन टप्प्यांत होणार आहे. प्रथम पोलीस विभाग, त्यानंतर शासकीय अधिकारी-कर्मचारी, त्यानंतर सर्वसाधारण नागरिकांवर अशी कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार गेल्या चोवीस तासात 17 पोलिसांसह इतर विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दुसऱ्यांदा हे पोलीस विनाहेल्मेट आढळून आल्यास दीड हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. सोबतच चारचाकी वाहनात सीटबेल्ट आवश्यक करण्यात आल्याची माहिती वाहतून पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील म्हणाले.
Home
chandrapur
हेल्मेट परिधान न केलेल्या 17 पोलिसांसह इतर विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment