Ads

दलित वस्तीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात साखळी उपोषणाचा सातवा दिवस

Seventh day of chain fast against injustice against Dalit community
घुग्घुस :-रविवार 16 डिसेंबर पासून घुग्घुस येथील बस स्थानक समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दलित वस्तीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात घुग्घुस भाजपातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. सातव्या दिवशीही साखळी उपोषणा सुरु होते.
घुग्घुस नगर परिषदेने घुग्घुस दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत वार्ड क्र. 4 व वार्ड क्र. 5 व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरला सरसकट वगळल्यामुळे वार्डातील सिमेंट रस्ते व अंडरग्राउंड नाली बांधकामासाठी 3.5 करोड रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकला नाही. या वार्डातील सर्व दलित बांधवांवर हेतूपुरस्पर अन्याय करण्यात येत आहे. जोपर्यंत वार्ड क्र. 04 व 05 ला निधी मिळत नाही व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहणार असून दोन दिवसात मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नकोडा जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, नकोडा माजी सरपंच ऋषी कोवे, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा दुर्गम, भाजपाचे प्रवीण सोदारी, संतोष कोंडपेल्लीवार उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment