Ads

रस्ते अपघात रोखण्यासाठीचा हा आगळावेगळा प्रयत्न.

गडचांदूर प्रतिनिधी:- गडचांदूर,कोरपना व नांदाफाटा या मुख्य मार्गावर हल्ली रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.दररोज कुठे ना कुठे किरकोळ तर गंभीर स्वरूपाचे अपघात घडत असतात.याला वाहन चालक व ट्रान्सपोर्ट कंपन्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून यांच्या चुकीमुळे निष्पाप लोकांचे जीव जात असल्याचे आरोप होत आहे.रस्त्याच्या बाजूला दुतर्फा उभी मोठमोठी वाहने सर्वसामान्य जनतेच्या जिव्हारी लागले असून रस्ते अपघातांची श्रृंखला सुरू असल्याचे मत व्यक्त होत आहे.असे असताना अनपेक्षितरीत्या घडत असलेल्या अपघातांवर आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिस विभाग गंभीर असल्याचे चित्र आहे.सध्याच्या परिस्थितीत गडचांदूर शहर आणि आजूबाजूला चार आंतराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग आहे.यापैकी मुख्यतः अंबुजा व माणिकगड सिमेंट कंपन्यांमधून सिमेंटची वाहतूक करणारे मोठमोठे वाहन रस्त्याच्या बाजूला दुतर्फा उभी असतात.यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठ्याप्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो.कित्येकदा अपघात ही घडत असतो.
सदर समस्या सोडविण्यासाठी गडचांदूर परिक्षेत्राचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले यांनी काही दिवसापूर्वी सिमेंट कंपनीला याविषयी उपाययोजना करण्याची सूचना दिल्याचे कळते.या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम अंबुजा सिमेंट कंपनीने अंबुजाफाटा येथील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट काँक्रिटने भरलेले लोखंडी ड्रम लावून नो-पार्किंग झोनची निर्मिती केली आहे.यामुळे नेहमी रस्त्याच्या बाजूला तासंतास उभ्या वाहनांना आता याठिकाणी उभे राहता येणार नाही.सतत वर्दळ असलेल्या हा रस्ता आता मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.यामुळे पुर्णपणे नाही तर काही प्रमाणात अपघातांवर आळा बसणार आहे यात दुमत नाही.एकिकडे या आगळ्यावेगळ्या नो-पार्किंग झोनमुळे अतिशय वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर झाली तर दुसरीकडे नागरिकांना दिलासा ही मिळाला आहे.ज्या पद्धतीने अंबुजा सिमेंट कंपनीने नो-पार्किंग झोन तयार केले आहे याचे अनुकरण इतर कंपन्यांनी सुद्धा आपापल्या परीने करावे जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टळू शकेल अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
फोटो:-
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment