Ads

चंद्रपुरात वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स सैराट झाल्याचे व्हिडिओ वायरल


Video goes viral of amateur photographers taking pictures of tigers in Chandrapur
चंद्रपुर:-चंद्रपुरात वाघाचे फोटो काढताना हौशी फोटोग्राफर्स सैराट झाल्याचे उघड झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात वाघाचे फोटो काढण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. केवळ 5 फूट दुरून फोटोची हौस पूर्ण केली जात असल्याचे वायरल व्हिडिओतुन स्पष्ट झाले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेले वाघ आता जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रात संचार करत आहेत. जिल्ह्यात मुक्तसंचार करणाऱ्या या वाघांच्या उत्तम व्हिडीओ-फोटो साठी वन्यजीवविषयक मुलभूत नियमांची पायमल्ली हौशी फोटो-व्हिडिओग्राफर्स करत आहेत. वाघांच्या या पॅपेराझिना शोधून वनविभागाने त्यांना आवर घालण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात वाघ रस्त्यावर सहजपणे दिसल्याच्या घटना घडतात. मात्र ग्रामस्थाना वाघाचे वर्तन ठाऊक असल्याने ते शिस्तीत आपला मार्ग निवडतात. मात्र ताज्या वायरल व्हिडिओत दिसलेली वाघांचा माग काढत त्यांचे फोटो-व्हिडीओ घेण्याची क्रेझ जीवावर बेतू शकते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment