Ads

पारंपारिक व्यवसायाला नव्या तंत्रज्ञानाची जोड द्या - आ. किशोर जोरगेवार

Add new technology to traditional business
चंद्रपुर :-सुतार ( झाडे ) हा कष्टकरी समाज आहे. काही तरी नवे करण्याची कल्पकता समाजातील युवकांमध्ये आहे. पारंपारिक व्यवसायातून उन्नती साधणाऱ्या समजांपैकी हा एक समाज आहे. या समाजाच्या अडचणीही माझ्या लक्षात आहे. त्या सोडविण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरु आहे. समाजातील युवकांनीही आता पारंपरिक व्यवसायाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत रोजगार देणा-याच्या भूमिकेत याव असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज सोमवारी मयात्मज सुतार (झाडे) समाज, चंद्रपूर, युवा मंच व जागृत महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. प्रभु विश्वकर्मा जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. एकोरी वार्ड येथील श्री. प्रभु विश्वकर्मा मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमाला माणीकराव गहुकर, अरुन बुरडकर, महेश शास्त्रकार, संजय शास्त्रकार यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, प्रभु विश्वकर्मा म्हणजे देवतांचा कारागीर अशी एक समजूत सर्व सामान्यांमध्ये आढळून येते. पांचाल समाजबांधवही त्याला अपवाद नाही. विश्वकर्मा वंशज म्हणून ज्या पाच समाजांची ओळख आहे त्यात सुतार (झाडे) समाजाचाही प्रमुखतेने समावेश आहे. त्यामूळे सृष्टी घडविणा-या प्रभु विश्वकर्मा यांचे वंशज असलेल्या या समाजातील युवकांनी आता समाज घडविण्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. विपरित परिस्थितीवर यशस्वीरित्या मात करत समाजातील यूवक विविध क्षेत्रात नाव लौकीक करत आहे. आता त्यांनी समाज उपयोगी कार्यातही सहभाग घेतला पाहिजे. सोबतच शिक्षण क्षेत्रातही समाजातील विद्यार्थ्यांनी पुढे राहिले पाहिजे, यात गरजू विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्यास आपण त्यांना मदत करु असेही यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले.
लाकडांना सुंदर आकार देत आकर्षीत वस्तू बणविण्याची कला या समाजाकडे आहे. आणि याच कलेमूळे समाजाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता शासकीय योजनांची मदत घेत ही ओळख समाजातील युवकांनी पूढे न्यावी असे आवाहणही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
अनेक समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहिले आहे. अशा समाजासाठी काम करण्याचा संकल्प आपण घेतला आहे. यासाठी समाज भवण, अभ्यासीका उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आले. साकार होणार असलेल्या या अभ्यासीकेत गरजू विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश दिल्या जाणार आहे. तर महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने येत्या काळात आपण महिलांसाठी मोठे आरोग्य शिबिरे आयोजीत करणार आहोत यात सूतार ( झाडे ) समाजानेही पूढाकार घेत सहभागी होण्याचे आवाहण यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. सदर कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment