Ads

ऐतिहासिक गोंड़कालीन शहरातील प्रेमाचे प्रतिक असलेल्या वास्तुवर पुष्पअर्पण

Wreath-laying on the symbol of love in the historic Gond period city
चंद्रपूरः- शहरात गोंडकालिन ऐतिहासिक वास्तु असलेली गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीवर "आपला वारसा, आपणच जपुया" अभियान अंतर्गत इको-प्रो संस्थेचे सदस्य व एफ़ ई एस महाविद्यालय विद्यार्थिनी यांनी पुष्पअर्पण करून कार्यक्रम साजरा केला.

आजच्या युवकांना प्रेमदिनाच्या निमीत्ताने क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, प्रत्येक नात्यातील प्रेम वृध्दीगंत करण्याकरिता विशीष्ट दिवसाची गरज नसुन, पाच्छिमात्याचे अनुकरण न करता विद्यार्थ्यांना योग्य संदेश देता यावा म्हणुन दरवर्षी गोंडराजे यांचे समाधीस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

गोंडराजे बिरशहा यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्युनंतर या वास्तुचे सुंदर असे बांधकाम केले होते. ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवनातील सुंदर आकर्षक अशी वास्तु बांधुन न थांबता राजेच्या मृत्युनंतर राज्यकारभार योग्य रित्या सांभाळत अनेक विकासकामे केलेली आहेत. अनेक मंदीराचा जिर्णोध्दार सुध्दा केलेला आहे, राणी हिराईचा कार्यकाळ चंद्रपूरच्या इतीहासात नोंदवीला गेलेला आहे. राणी हिराईने आपल्या कार्यातुन आपल्या पतीप्रती असलेले प्रेम अजरामर केले आहे. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी-युवतीनी घेण्याची गरज आहे.

चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन पुरातन वास्तु खऱ्या अर्थाने आपला वारसा संवर्धनाचा तसेच आपल्या कार्यातुन गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर करून ताजमहलच्या तोडीची वास्तु निर्माण सोबतच पुढील काळात योग्य राजकारभार करून राणीने एक आदर्श घालुन दिलेला आहे. राणी हिराई आणि गोंडराजे बिरशहा यांच्यातील प्रेमचं होत की जे मृत्युनंतरही अजरामर झाले आहे, त्याच्या कार्यातुन ते सतत जिवंत राहणार आहे असे मत प्रा. डॉ सचिन बोधाने यांनी व्यक्त केले.

आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यास स्वतःला पुढाकार घेण्याची गरज असून, "आपला वारसा, आपणच जपुया" या अभियानाला महत्व आहे. तसेच आजच्या दाम्पत्यांनी तसेच युवकांनी अशा स्थळांना, स्मारंकाना भेट देत आपल्या जिवनात, हा आदर्श घेण्याची गरज आहे, ऐतिहासिक वास्तू संवर्धन करिता पुढाकार घेण्याची गरज आहे असे मत यावेळी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केले.
आज संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविक प्रा डॉ प्रमोद रेवतकर,
यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. राजेंद्र बारसागड़े रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी तर आभार प्रा डॉ सुवर्णा कायरकर यांनी मानले.
यावेळी प्रा. डॉ मेघमाला मेश्राम, डॉ जुमले मैडम, डॉ जूनघरे मैडम, डॉ कावले मैडम, डॉ ठोम्बरे मैडम, डॉ उमरे, डॉ बंसोड़, डॉ वानखेड़े, प्रा निमागड़े सह इको-प्रो चे नितीन रामटेके, सुनील पाटील, ओमजी वर्मा, धर्मेंद्र लुनावत, आकाश घोड़मारे, विनोद दुधनकर, सचिन धोतरे, कपील चौधरी, योजना धोतरे, भारती शिंदे, मनीषा जैस्वाल, खुशबू जैस्वाल, प्रगती मार्कण्डवार, पूजा गहुकर व पुरातत्व विभाग चे कर्मचारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment