घुग्घुस:- घुग्घुस-पडोली मार्गांवर पर्यावरण विषयी उद्यान उभारून त्या उद्यानाला स्व. बाळासाहेब ठाकरे नाव देण्यात यावे अशी मागणी युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांनी मा.ना.श्री. आदित्य साहेब ठाकरे पर्यटन तथा पर्यावरण मंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदनातून केली आहे.
रविवारी 13 फेब्रुवारीला मा. ना. आदित्य साहेब ठाकरे पर्यटन व पर्यावरण मंत्री महाराष्ट्र शासन हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे व युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश भाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचे स्वागत केले तसेच शिष्टमंडळासह निवेदन देऊन मागणी केली.
चंद्रपूर जिल्हातील घुग्घुस व पडोली क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे हे औद्योगिक क्षेत्र असल्याने प्रदूषण मोठ्याप्रमाणात आहे त्यामुळे येथील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. घुग्घुस-पडोली राज्य मार्गावर एक पर्यावरण विषयी उद्यान उभारण्यात यावे या उद्यानास स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. चंद्रपूर जिह्यातील घुग्घुस हे शहर सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ओळखल्या जाते. घुग्घुस-पडोली रस्त्यावर एक पर्यावरण विषयी उद्यान उभारल्यास पर्यावरण विषयी जनजागृती होऊन भावी पिढीला पर्यावरणाची माहिती मिळणार.
निवेदन देतांना शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment