Ads

सीतारामपेठच्या गुराख्याचा बळी घेणारी वाघिण जेरबंद


भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-
दहा दिवसांपूर्वी भद्रावती तालुक्यातील सीतारामपेठ येथील नमो धांडे या गुराख्याचाsheperd बळी घेणा-या पट्टेदार वाघिणीला Tigressअखेर दि.१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
प्राप्त माहितीनुसार, मागील दीड ते दोन महिन्यांपासून भद्रावती तालुक्यातील कोंढेगांव, सीतारामपेठ, मुधोली, टेकाडी या गावांच्या वनव्याप्त परिसरात पट्टेदार वाघिणीने धुमाकूळ घातल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक गुरांचा या वाघिणीने फडशा पाडला होता. एवढेच नाही तर ग्रामस्थांवर हल्ले सुद्धा केले होते. अलिकडेच सीतारामपेठ येथील नमो धांडे या गुराख्यावर हल्ला करुन त्याला ठार केले होते.
दरम्यान, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करत कोंढेगांव येथील सरपंच चौखे आणि उपसरपंच रवी घोडमारे यांच्या नेतृत्वात परिसरातील ग्रामस्थांसह वनविभागाला निवेदन सादर केले होते. मात्र वनविभागाकडून फारशी दखल घेण्यात आली नव्हती. परंतु नमो धांडे या गुराख्याचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू होताच वनविभाग खळबळून जागे झाले. ज्या ठिकाणी नमो धांडेला वाघिणीने ठार केले, त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. परंतु या पिंजऱ्याकडे वाघिणीने ढुंकूनही पाहिले नाही. याच दरम्यान वाघिणीने दि.८ फेब्रुवारी रोजी कोंढेगांव येथील अंकुश केदार यांची गावाशेजारीच गाय ठार केली. या गायीचे मांस खाण्यासाठी वाघिण या ठिकाणी येईल असा अंदाज बांधुन वनविभाग आणि पोलिस विभाग यांनी सदर ठिकाणी सापळा रचला. दरम्यान,दि.१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाघिण तेथे येताच वनविभागाच्या नेमबाजांनी वाघिणीवर बेशुद्ध करणा-या इंजेक्शनच्या फैरी झाडून वाघिणीला बेशुद्ध केले. त्यानंतर तिला पिंजऱ्यात टाकून दुसरीकडे नेण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment