चंद्रपुर :- इको प्रो च्या आंदोलनानंतर चंद्रपूर येथील गोंडकालीन रामाळा तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, त्याची पाहणी करण्याकरिता राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज 13 फेब्रुवारी रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची उपस्थिती होती. रामाळा तलाव येथे सध्या खोलीकरण काम सुरू झाले असून, सौंदर्यीकरण करण्याच्या कामासाठी कामामध्ये गती वाढविण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या. दौर्यात त्यांनी चांदा किल्ला येथील बगड खिडकी बुरुजाची पाहणी केली. यावेळी अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना चंद्रपूर किल्ला पर्यटन दॄष्टिने इको-प्रो च्या स्वच्छता अभियान 'आपला वारसा, आपणच जपुया' ची माहिती जाणून घेतली, पाहणी दौऱ्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मंत्री विजय वडेट्टीवार आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या भेटिदरम्यान मंत्री आदित्य ठाकरे यांना चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात व कमलापूर हत्ती कैम्प बाबत पुनर्विचार करण्याबाबत निवेदन दिले.
गोंडकालिन चांदा किल्ला मॉडलचे आकर्षण; मंत्र्यांनी केले कौतुक
चंद्रपूर शहराला अकरा किलोमीटरचे परकोट लाभले आहे. गोंडकालीन राजवटीमध्ये या किल्ला परकोटाची उभारणी करण्यात आली. त्याची प्रतिकृती इको प्रोचे सदस्य संजय सब्बनवार यांनी साकारली. हे मॉडेल रामाळा तलाव येथे ठेवण्यात आले होते. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांनी संजय सब्बनवार यांचे कौतुक केले.
0 comments:
Post a Comment