चंद्रपुर :- समाजात सेवा देणाऱ्या हाताची संख्या वाढायची गरज असून स्थानिक मदतीचा हात ह्या नियोजित स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकाऱ्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे त्यांनी अल्पावधीत देणे समाजाचे स्वरूपात गरजू महिलांना जे वस्त्रालंकार दिले हे निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार चंद्रपुर मनपा लोकप्रिय पार्षद सुभाष कासनगोट्टूवार यांनी विकलांग सेवा संस्था सभागृहात महिलांना वस्त्र वितरण करताना प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला रक्तदान चळवळीतील विधायक कार्यकर्ते श्री सुभाष तेटवार व अन्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत गीत अनुराधा मेश्राम यांनी सादर केले पाहुण्यांचे स्वागत मदतीचा हात बहू संस्थेच्या संस्थाध्यक्षा प्रणाली येरपुडे यांनी केले तर आभारप्रदर्शन रवींद्र राठोड ह्यानी केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या साजरा करण्यासाठी प्रसाद पान्हेरकर ,सूरज बागडे, मनोज निनावे, स्वाती निनावे, रामेश्वर नुणूचे इत्यादींनी परिश्रम घेतलेत.
0 comments:
Post a Comment