Ads

*भावी डॉक्टरला तेली समाजाकडून आर्थिक मदत.

चंद्रपूर : समाजात शिकण्याची व काहीतरी करून दाखविण्याची धडपळ असते. परंतु आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे कुठेतरी शिक्षणात तडजोड करावी लागते. परंतु समाजातील दानशूरांनी मदत केल्यास शैक्षणिक क्षेत्रातील येणारे आर्थिक अडथळे देखील दूर होऊ शकतात. याच्या प्रत्यय अलीकडेच आलाय, चंद्रपूर स्नेहा वाघमारे हिची निवड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथे प्रवेश मिळाला. या भावी डॉक्टरला पुढील शिक्षण घेण्याकरिता संताजी भिसी गृपतर्फे ५१ हजार तर इतर समाज बांधवांकडून वैयक्तिक मदत करून यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

यावेळी विजय अगडे, राजेश बेले, तिघारे, ताराचंद देऊरमल्ले, डॉ. महेश भांडेकर, व्ही. आर. जे. गृप, रामदास बानकर, सुरेश भुते, राजेंद्र पोटदुखे यांनी वयक्तिक तर संताजी भिसी २०२२ या गृपने ५१ हजार रुपये मदत दिली आहे. आज स्थानिक भिवापूर वार्ड येथील साई मंदिर येथे छोटेखानी कार्यक्रमात स्नेहा वाघमारे हिच्या सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सूर्यकांत खनके, नगरसेवक देवेंद्र बेले, नामदेव वरभे, गोविल मेहरकुरे, माजी नगरसेवक आकाश साखरकर, सचिन कुंभलकर, शेखर जुमडे, बिजवे, निलेश बेलखंडे, शैलेश जुमडे, राजेंद्र रघाताटे, जितेंद्र इटनकर, नितेश जुमडे, रवी लोणकर, विकास घटे, अनिल आंबोरकर, विनोद कावळे यावेळी उपस्थिती होते.

आपण ही तेली समाजाच्या वतीने मला केलेल्या मदतीला प्रेरित होऊन डॉक्टर झाल्यावर समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी व रूग्णांची मदत करित राहिल असा निर्धार स्नेहा वाघमारे हिने केला आहे.
भविष्यातही अशा प्रकारे तेली समाजबांधव उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणीत असल्यास समाज बांधव मदत करतील, अशी ग्वाही यावेळी तेली समाज बांधवानी दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment