घुग्घुस : महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी काँग्रेस कार्यलयाच्या प्रांगणात महाराजांची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली.
ही प्रतिकृती संपूर्ण शहराचे आकर्षणाचे केंद्र झाले होते.
याच ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
शिवजयंतीच्या पावन पर्वावर गरजवंत अपंग बांधव गोपाल ठाकरे यांना काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्यातर्फे बैसाखी भेट स्वरूपात देण्यात आली.
परिसरातील नागरिकांना अल्पहार स्वरूपात चना - चिवडा वितरित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते किशोर बोबडे,अलीम शेख, भैय्या भाई,स्टीवन गुंडेटी,श्रीहरी शेंगारप,सौ.पुष्पा ताई नक्षिणे,सौ.सरिता गौरकार,सरस्वती कोवे,सौ.दीपा बोकडे,लखन हिकरे,रोशन दंतलवार, विशाल मादर,इर्शाद कुरेशी, सुकुमार गुंडेटी,विजय माटला,देव भंडारी,रमेश रुद्रारप,विशाल लोणगाडगे,सचिन कोंडावार, संजय कोवे,सुनील पाटील,सचिन नागपुरे,सुमेश रंगारी,अय्यूब कुरेशी,साहिल सैय्यद, रंजित राखुंडे, व मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment