Ads

घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवीत युवकाने केला बलात्कार .

Divorced woman was raped by a young man showing her the lure of marriage
चंद्रपूर :- चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील 27 वर्षीय आशिष गजभिये या युवकाने गावातील घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केल्याची घटना घडली, पोलिसात तक्रार दिल्यावर आरोपी गजभिये हा पसार झाला, मात्र पोलीस आरोपीला पकडण्यास अपयशी ठरत असून मला न्याय द्या अशी मागणी पीडितेने पत्रकार परिषदेत केली.
खडसंगी गावातील खाजगी बँक चालविणारा 27 वर्षीय आशिष दिलीप गजभिये हा वर्ष 2017 पासून पीडितेशी ओळखी करत घरी यायचा, काही दिवसांनी आशिष ने पीडितेसोबत लग्न करतो अशी गळ घातली.

पीडितेचा वर्ष 2009 मध्ये घटस्फोट झाला होता,पीडितेला एक मुलगी आहे. पीडितेला आशिष ने लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले, मागील 5 वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवीत पीडितेचा अत्याचार आशिष गजभिये यांनी केला, लग्नाचे आमिष दाखविले पीडितेला आणि आशिष ने लग्न केले दुसऱ्या मुलीसोबत,लग्न करण्याचा नावाखाली पीडित महिलेचा शोषण करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून त्यांचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी पीडितेने पत्रकार परिषदेत केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment