Ads

दुर्गापूर व उर्जानगर ग्रामपंचायत ने दिले नितीन भटारकर यांच्या उपोषणाला जाहीर समर्थन.

चंद्रपुर :-दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात सतत सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात आमरन आंदोलनाची सुरुवात नितीन भटारकर यांनी काल पासुन केली आहे. सदर ज्वलंत विषया संदर्भात या उपोषणाला आज अनेक संघटनांनी आपला पाठिंबा देऊन जाहीर समर्थन दिले.

आज दुर्गापूर ग्रामपंचायतच्या सरपंचां सौ पूजाताई मानकर, उपसरपंच प्रज्योत भाऊ पुणेकर, माजी सरपंच सुजित भाऊ नळे, माजी सरपंच अमोल भाऊ ठाकरे, माजी उपसरपंच आसिफ भाई खान, ग्रामपंचायत सदस्य सारंग भाऊ वाकोडे, सुमेघ भाऊ मेश्राम, जॉन्सन भाऊ नळे, सचिन भाऊ मांदाळे, निखिल भाऊ हस्ते सौ. वर्षा ताई रत्नपारखी यांनी पत्र देऊन समर्थन जाहीर केले.

तसेच सोबत ऊर्जानगर ग्रामपंचायतच्या सरपंचा सौ. मनीषाताई येरगुडे, उपसरपंच अंकित भाऊ चिकटे, ग्रामपंचायत सदस्य मा. राजूभाऊ डोमकावळे, सागर भाऊ तुरक, अनुकुल भाऊ खन्नाळे, सौ. मनिषताई इरपाते, सौ. सारिकाताई कावळे, सौ. राजश्री ताई आवळे, लोकेश भाऊ कोटरंगे हे सुध्दा सर्व सदस्यांसह उपोषणास्थळी येऊन समर्थन पत्र दिले असल्याने यामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.
वीज कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महानिर्मिती, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर यांनी दिला नितीन भटारकर यांच्या उपोषणाला पाठींबा

चंद्रपूर:- दुर्गापूर, उर्जानगर व लगतच्या परिसरात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यात सतत कामगार व सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्याने वन विभागाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीच्या विरोधात आमरन उपोषण आंदोलनाची सुरुवात नितीन भटारकर यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ पासुन केली आहे.

सदर ज्वलंत विषया संदर्भात या उपोषणाला सर्वसामान्य नागरिकांसह अनेक संघटनांनी आपला पाठिंबा देऊन जाहीर समर्थन दिले आहे.

वीज कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महानिर्मिती मधील महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, ग्रॅज्युएट असोसिएशन इंजिनीअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना, पॉवर फ्रंट युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, असोसिएशन ऑफ केमिस्ट, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य वीज ब. अ. कर्मचारी संघ, ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटना चंद्रपुर या सर्व कामगार संघटनांच्या अध्यक्ष, सचिव व संघटना प्रतिनिधींनी सामूहिक पने उपोषणास्थळी येऊन पाठींबा असल्याचे संयुक्त पत्र दिले असल्याने निश्र्चितच या आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment