Ads

रेल्वेच्या धडकेत युवकाचा अपघाती मृत्यू

Accidental death of a youth in a train collision
विसापूर/चंद्रपुर :- बल्लारपूर कडून रेल्वे मार्गाने तो विसापूर कडे पायी येत होता.मुखबधिर असल्याने त्याला रेल्वे गाडीचा अंदाज आला नाही. मागून रेल्वे गाडीने जबर धडक दिली. याधडकीत तो जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता गोंडवाना विसापूर हाल्ट रेल्वे स्थानकाजवळ पोल क्रमांक ८८६/७-९ अप रेल्वे लाईन वर घडली. रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रणजित रामू गेडाम ( वय २७)असे असून तो बल्लारपूर येथील पंडित दीनदयाल वार्डातील रहिवासी आहे.
विसापूर गोंडवाना रेल्वे स्टेशन जवळ एका इसमाचा अपघात झाला. याची माहित रेल्वे पोलिसांना देण्यात आली. तो इसम विसापूर येथील नाही. यामुळे अनोळखी असल्याचे सुरुवातीला दिसून आले. अधिक चौकशी केली असता, तो मुखबधिर असून बल्लारपूर येथील शरबिधन तिवारी यांचेकडे राहत होता. रणजित गेडाम हा दुग्ध व्यवसाय करत होता. तो अनाथ असल्यामुळे तिवारी यांचे कडे तो वास्तव्याला होता. अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना घटनेचा पंचनामा करून त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे नेण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून घटनेचा अधिक तपास विसापूर पोलीस चौकीचे जमादार घनश्याम साखरकर, जीवन पाल करत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment