Ads

शिवजयंती हा भारतीयांसाठी ऊर्जा देणारा दिवस – आ. सुधीर मुनगंटीवार .

चंद्रपुर :-
जय भवानी जय शिवाजी हे शब्‍द केवळ जयघोषाचे शब्‍द नसून या शब्दांमध्‍ये ऊर्जा, शक्‍ती, उत्‍साह आहे. जो या देशाकडे वाईट नजरेने बघेल, रय्यतेवर अन्‍याय, अत्‍याचार करेल त्‍यांना जय भवानी जय शिवाजी हे शब्‍द सबळ प्रत्‍युत्‍तर असेल. दुष्‍टांच्‍या निर्दालनासाठी हा जयघोष रामबाण उपाय असेल. १९ फेब्रुवारी हा दिवस तमाम भारतीयांसाठी ऊर्जा देणारा दिवस आहेत. हिंदवी स्‍वराज्‍याचे संस्‍थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मी आदरांजली अर्पीत करतो, वंदन करतो अश्‍या भावना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केल्‍या.

दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्‍य साधुन चंद्रपूरातील शिवाजी महाराज चौकात भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास शौर्याची, प्रामाणिकतेची, सर्व धर्मांचा आदर करण्‍याची शिकवण देणारा आहे. रय्यतेच्‍या कल्‍याणासाठी लढलेला हा जाणता राजा युध्‍दाला जाताना शेतक-यांच्‍या शेतातील भाजीच्‍या देठाला धक्‍का लागणार नाही असा कडक सुचना आपल्‍या सैन्‍याला द्यायचे. छत्रपतींची शिकवण आपल्‍या कृतीत, आचरणात आणुन देशहितासाठी जगण्‍याचा संकल्‍प करण्‍याचा दिवस असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

यावेळी भाजपा ग्रामीण जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती अध्‍यक्ष संदीप आवारी, मनपा सभागृह नेता देवानंद वाढई, संघटन मंत्री राजेंद्र गांधी, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, मनपा सदस्‍य रवि आसवानी, सौ. अंजली घोटेकर, अनिल फुलझेले, संजय कंचर्लावार, सोपान वायकर, वंदना तिखे, सविता कांबळे, संगीता खांडेकर, शिला चव्‍हाण, वंदना जांभुळकर, शितल गुरनुले, पुष्‍पा उराडे, चंद्रकला सोयाम, माया उईके, वनिता डुकरे, रवि लोणकर, संदीप आगलावे, दिनकर सोमलकर, विठ्ठलराव डुकरे, तुषार सोम, रामपाल सिंह, रवि गुरनुले, राजेंद्र खांडेकर, अरूण तिखे, डॉ. दीपक भटटाचार्य, धनराज कोवे, विनोद शेरकी, मोहम्‍मद जिलानी, किरण बुटले, वंदना संतोषवार, अॅड. हरीश मंचलवार, अॅड. सुरेश तालेवार, चंदू गन्‍नुरवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, सुनिल डोंगरे, प्रमोद क्षिरसागर, यश बांगडे, कुणाल गुंडावार, आकाश मस्‍के, राजेश यादव, मयुर चव्‍हाण, सतिश तायडे, सत्‍यम गाणार, अक्षय शेंडे, संजय पटले, गणेश रामगुंडेवार, प्रविण उरकुडे, मनिष पिपरे, राजेश बोमनवार, सिंधु राजगुरे, सपना नामपल्‍लीवार, प्रभा गुळधे, रेणु घोडेस्‍वार, माया मांदाडे, रामजी हरणे, संदीप देशपांडे, प्रमोद शास्‍त्रकार, मनोरंजन रॉय, राजू जोशी, पप्‍पु बोपचे, सय्यद चॉंद आदींची उपस्थिती होती.

जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी हा संपूर्ण परिसर निनादुन गेला होता.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment