Ads

ट्रक्टर पलटून इसमाचा मृत्यु; अन्य एक गंभीर जखमी


सिंदेवाही प्रतीनिधी:- सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मरेगाव- गुंजेवाही रोड वरील मरेगाव (चक) नजीक ट्रक्टर पलटी खाऊन इसमाचा जागीच मृत्यु झाल्याची काल रात्रौच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की सिंदेवाही प. स. सदस्य राहुल पोरड्डीवार यांची विना नंबर प्लेट ची आयशर ट्रॅक्टर ड्रायव्हर प्रेमा सुधाकर माहुर्ले व दिपक बापूजी चौधरी (वय 40) रा. पवना हे सिंदेवाही वरुन रात्रौ ८ ते ८.३० च्या सुमारास पवनपार येथे जात होते. सदर ट्रक्टर मरेगाव चक (टोल्या) समोर गेली असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दिपक बाबुजी चौधरी (वय ४०) हा इसम जागीच ठार झाला. तर प्रेमा सुधाकर मोहुर्ले हा गंभीर जख्मी झाला. सदर दोन्ही इसम हे नशेच्या धुत मध्ये असल्याची सर्वत्र चर्चा असून मृतक गाडी चालवत असल्याची चर्चा आहे. सदर हा इसम ठेकेदार राहुल पोरेडिवार यांच्याकडे सुपरवायजर म्हणून कामाला असल्याचे कळते.
प्रेमा सुधाकर मोहुर्ले याला तात्काळ सिंदेवाही ग्रामीण रूग्णाल्यात भरली केले असून त्याच्यावर उपचार चालू आहे. संपूर्ण घटनेचा तपास सिंदेवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार गुंजेवाही राऊत हे करत असुन ट्रक्टर ड्रायव्हर वर विविध कलमा अंतर्गत मर्ग दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment