Ads

घुग्घुस लाॅयड मेटल कंपनी व ए. सी. सीमेंत कंपनितील रेती साठा व बांधकामाची चौकशीची मागणी

घुग्घुस :-शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे व निलेश भाऊ बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घुस येथील लाॅयड मेटल कंपनी व ए.सी.सी. सीमेंट कंपनी असे दोन कारखाने आहे‌. या दोन कंपनीच्या आत मध्ये सध्या सिव्हिल कन्स्ट्रक्शनचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु या दोन कंपनीच्या आत मध्ये सुरू असलेल्या कामामध्ये अवैध रेतीचा वापर होत आहे व त्याठिकाणी अवैध रेतीचा साठा आहे मागील तीन ते चार वर्षांपासून घुग्घूस परिसरातील रेती घाटाचा लिलाव झाला नाही त्यामुळे अवैध रेती तस्करी सुरू आहे या कंपनीत सुरू असलेल्या कामात अवैध रेतीचा वापर होत असल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे.त्यामुळे या कंपनीत काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करून ठेकेदाराची लायसन रद्द करीत तेथील बांधकामाची चौकशी करून रेती साठा जप्त करण्यात यावी.अन्यथा शिवसेना तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल .
अशी युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांनी मा. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली.
निवेदन देतांना शिवसेना पदाधिकारी माजी शिवसेना शहर प्रमुख बंटी भाऊ घोरपडे , उपशहरप्रमुख योगेश भांद्दकर, निखिल मोहीतकर, राज सोपर,फियुश कांबळे, तन्मय काळे ,शकील सिद्दिकी,साहेब सिद्दिकी, बलराम सरोज व शिवसैनिक उपस्थित होते.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment