Ads

कायदेशीर कारवाईसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व आम आदमी पार्टी पोलिसांत तक्रार करणार.


जिवती:- पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत ५४२ शिक्षकांनी बोगस बिले सादर करुन 'एलटीसी' चा लाभ घेतला आहे. यात १३ लाख ६८ हजार ६४३ रुपयांच्या शासकीय निधीचा उपहार झाला, असे लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे. अहवालात रेल्वेचे तिकीट बनावट असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई कराव, यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष व आम आदमी पार्टीनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. पण अधिकारी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जिवन तोगरे व आम आदमी पार्टीचे गोंविद गोरे आक्रमक झाले आहे व पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंचायत समिती जिवती मधील ५४२ शिक्षकांनी बोगसगिरी करून 'एलटीसी' रक्कमेची उचल केली. याकरिता आदर्शवादी शिक्षकांनी प्रवास, हॉटेलचे बनावट बिल सादर केले. अधिकाऱ्यांनीसुध्दा कोणतीही शहानिशा न करता एलटीसी रक्कम मंजूर केली. या शिक्षक महाशयांनी देवाला देणगी दिल्याचे बोगस बिल दिले. शिक्षकांची ही बनवाबनवी लेखापरीक्षण अहवालात उघड झाली आहे. यासंदर्भात लेखापरीक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली असता असता शिक्षकांची बोगसगिरी चव्हाट्यावर आली. विशेष म्हणजे, लेखापरीक्षण अहवालात रेल्वेचे तिकीट बनावट असल्याचा उल्लेख केला आहे, तसेच ‌गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार व शासन निर्णय १० जुनं २०१५ नुसार रजा प्रवास धारकांच्या १८ वर्षा वरील अपत्यांना सदत रजा प्रवास सवलतीचा लाभ अनुज्ञेय नसताना अनेक शिक्षकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे, असे लेखापरीक्षण अहवाल नमूद केला आहे. या गंभीर प्रकारणात उचल केलेली रक्कम वसुलपात्र असल्याने संबंधित शिक्षकांकडून वसूल करण्यात यांवे, असे म्हटले आहे. पण या प्रकरणी शिक्षकांसह अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जिवन तोगरे व आम आदमी पार्टीचे गोंविद गोरे नी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु अधिकारीसुध्दा याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जिवन तोगरे व गोविंद गोरे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. पण तत्पूर्वी पोलिसांनी तरी कारवाई करावी, याकरिता तक्रार करणार आहे. या बनवाबनवीच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिवन तोगरे व गोविंद गोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी
बोलताना म्हटले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment