Ads

कर्तव्यदक्ष पी एस आय राजेश उंदीरवाडे यांच्या सतर्कतेने वाचले अपघातग्रस्ताचे प्राण

Dutiful PSI Rajesh Undirwade's vigilance saved the life of the accident victim
ब्रम्हपुरी :-कुणाचाही जीव वाचवणं याहून पुण्य ते काय..? जीव वाचवणारा 'देवदूत' म्हणून ओळखला जातो, असाच एक प्रकार ब्रह्मपुरी येथे बाबा फरिद पेट्रोल पंपाजवळ वडसा-ब्रह्मपुरी मार्गावर रविवारला सायंकाळच्या दरम्यान ट्रॅक्टर उतार भागावरून अनियंत्रित होतं पलटी खाल्ल्याने ट्रॅक्‍टर ड्रायव्हर युवक जीवाच्या आकांताने ओरडत असताना पेट्रोलिंग वर असलेले ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पी एस आय राजेश उंदिरवाडे हे त्या ड्रायव्हर युवकासाठी "देवदूत" ठरल्याने शहरात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

नव्या उमेदीचे पीएसआय उंदीरवाडे हे शहरासाठी एक "डॅशिंग" ठरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी लोकमान्य टिळक शाळेजवळ पेट्रोलिंग वर असताना अचानक पणे पिंपळगाव येथील एक ट्रॅक्टर ब्रह्मपुरी वरून लोखंडी रॉड पिंपळगाव येथे नेत असताना लोकमान्य टिळक शाळेच्या जवळील उतार भागावरून अनियंत्रित झाल्याने पलटी खाल्लेल्या अवस्थेत पडून होता तर ड्रायव्हर युवकाच्या गळ्याला फास आवडल्या गत ट्रॅक्टरच्या वापरात असलेला दोर गळफास अवस्थेत गुंतल्याने सदर युवक जीवाच्या आकांताने ओरडत असल्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी पीएसआय राजेश उंदीरवाडे यांना दिसता क्षणी त्यांनी समयसूचकता दाखवत बाजूच्या हॉटेलमध्ये कांदे,मिरची कापण्यासाठी वापरात येणारा चाकू क्षणाचाही विलंब न करिता आणत तत्परता दाखवत युवकाच्या गळ्याला गळफास लागलेला दोर कापल्याने क्षणात युवक सोडला गेला व त्या युवकाचे प्राण वाचले.

सदर ट्रॅक्टर ड्रायव्हर ला पीएसआय राजेश उंदीरवाडे यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पुढील उपचारासाठी पाठवत आपल्या कार्याला न्याय देत कसलाही मोठेपणा उपस्थितांना दाखवण्याचा प्रयत्न न केल्याने उपस्थित जनसमुदायांनी पीएसआय उंदीरवाडे यांचे भरभरून कौतुक केल्याचे बघायला मिळाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment