Ads

*महिला तथा व्यापारी वर्गाची शौचालय अभावी होत असलेली कुचंबना थांबवा. आम आदमी पार्टी बाबुपेठ ची मागणी

Stop the lack of toilets for women and business class. Aam Aadmi Party demands Babupeth
चंद्रपुर :-चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या बाबुपेठ प्रभागाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आले आहे .बाबुपेठ मधील आंबेडकर चौक, जूनोना चौक हे दोन्हीही ठिकाण अतिशय रहदारीचे असून येथे बस थांबे दिलेले आहे . मागील कित्येक वर्षा पासून बाबुपेठ जनतेची या दोन्ही चौकात सुलभ शौचालय देन्यात यावे अशी मागणी होती . परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ते होवू शकले नाही याबाबत आम आदमी पार्टी चे शहर सचिव राजुभाऊ कूडे यांच्या कडे आटो रिक्षा चालक, व्यवसायिक तसेच महिलांची तक्रार आली त्या अनुषंगाने आज माननीय आयुक्त यांच्याकडे निवेदनातून मागणी करण्यात आली तसेच मागणी रास्त असल्या मुळे आयुक्तांनी सुध्दा यावरती लवकरच कार्यवाही करू असे आश्वासन दिले. या वेळेला आपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्दावार जी,जिला कोषाध्यक्ष भिवराज सोनी , शहर सचिव राजु भाऊ कूडे, निखिल बारसागडे, चंदु माडुरवार, सागर बोबडे, कालिदास ओरके, सुजाता बोधेले, जयदेव देवगडे, भीमराज बागेसर, अंजु रामटेके, बाबाराव खडसे सुखदेव दारुंडे, सुरेंद्र जीवने, अमोल राजूरकर, जयंत थूल उपस्थीत होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment