सिंदेवाही प्रतिनिधी :-पान ठेल्याची उधारी दिली नाही म्हणून काठीने डोक्यावर वार करून जीव जीवघेणा हमला करणाऱ्या आरोपीवर कार्यवाही कधी? पोलीस विभाग अशा आरोपीला पाठीशी का घालत आहे असा प्रश्न रजिस्टर पीडित शिशुपाल यशवंत हटवादे यांनी केला आहे.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 22 जानेवारी 2022 ला सकाळी साडेनऊ च्या सुमारास शिशुपाल संजय हटवादे संजय सहारे व कृपाल पुस्तोडे तिघेजण खाती मोहल्ल्यातील गेट चर्चा करीत बसले होते. आरोपी चे वडील ईश्वर बोरकर यांनी तिथे येऊन शिशुपालला आरोपी स्वप्नील पान ठेल्यावर बोलवत असल्याचा निरोप दिला. शिशुपाल यांनी थोड्यावेळाने येतो असे सांगितले. दरम्यान स्वप्निल काठी घेऊन त्या ठिकाणी आला व माझी उधारी का देत नाही असे विचारत काठीने पाठीवर डोक्यावर वार करू लागला. काठीचा वार डोक्याच्या उजव्या बाजूला लागल्यामुळे डोकाफुटून रक्त वाहू लागल्या. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्या. जखमी शिशुपाल ला ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी जखमी शिशुपाल ला सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. चार दिवस औषध उपचार केल्यानंतर दिनांक 25 जानेवारीला सुट्टी देण्यात आली. दरम्यान हल्ला करणारा आरोपी स्वप्निल मात्र गावात बेखोफ वावरत होता. कशाचाही विचार न करता जीव घेणे हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या का आवळण्यात आले नाही? आरोपीवर कार्यवाही कधी होणार? असा प्रश्न पीडित शिशुपाल विचारत आहे. दिनांक एकोणवीस जानेवारीला नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागलेला होता त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कार्यवाही केली:- तपास अधिकारी नेरलवार यासंबंधात तपास अधिकारी नेरलवार यांच्याशी संपर्क साधला असता सदर आरोपीवर भा द वि कलम 320 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रतिबंधात्मक कार्यवाही करून आरोपीला सोडण्यात आले असे सांगितले.
0 comments:
Post a Comment