Ads

मोहर्ली बफर क्षेत्रात पर्यटनाकरिता वढोली बीट मार्गे नवीन गेटला परवानगी द्या.

Allow new gate via Wadholi Beat for tourism in Moharley Buffer area.
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरालगत असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असून याचे क्षेत्रफळ जवळपास ६२५.४ कि.मी. पसरलेले आहे. सदर अभयारण्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला असून यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले आहे.

या व्याघ्र प्रकल्पात शहराच्या जवळ असलेल्या मोहर्ली क्षेत्रातील सफारी करिता जंगल व प्राणी प्रेमिंचा कल मोठ्या प्रमाणात असतो व यामुळे अनेकांना अनेकदा ऑनलाइन बुकिंग मिळत नसल्याने भ्रमनिरास देखील होत असतो.

मोहर्ली क्षेत्रातील (कोअर/बफर) सफारी करिता शहरानजीक असलेल्या मोहर्ली, आगरझरी व अडेगाव-देवाळा या तीन मार्गे पर्यटनाकरिता मर्यादित जिप्सिंद्वारे प्रवेश दिल्या जातो व यामुळे सभोवतालच्या गावातील सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे.

तसेच ताडोबा येथील मोहरली बफर अंतर्गत येत असलेल्या क्षेत्रालगत वढोली बीट असून वढोली, कडोली, चिचोली, किटाळी व भटाळी असे जवळपास पाच गावे लागुन व अतिशय जवळ आहेत. तसेच सदर मार्ग हा ईरई डॅम करिता जाणारा आहे. या मार्गावर अनेक मोठमोठ्या खाजगी रिसॉर्टचे बांधकाम झालेले असून काही प्रस्तावित आहे. व म्हणून वढोली बीट मधून मोहरली क्षेत्रात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाकरिता जाण्याकरिता काही मर्यादित जीप्सिंना सकाळ व दुपारच्या वेळेस परवानगी दिल्यास शासनाच्या महसुली उत्पन्न वाढिसह लगतच्या गावातील सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.

व म्हणून सदर मार्गाद्वारे पर्यटनाकरिता प्रवेश द्यावा याकरिता महाराष्ट्र राज्याचे वन राज्यमंत्री मा.ना.श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी लेखी निवेदन दिले.

सदर मागणी संदर्भात स्थानिक अधिकार्‍यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही वन राज्यमंत्री श्री. भरणे यांनी नितीन भटारकर यांना दिली.

सदर निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचेसह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, राजकुमारजी खोब्रागडे, माजी सरपंच अमोल ठाकरे हे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment