Ads

ग्रामसफाईतील कचऱ्याची केली होळी

भद्रावती तालुका प्रतिनिधी (जावेद शेख):-होळीच्या दिवशी सज्जनांनी, वार्षीक यज्ञाची केली आखणी I संपुर्ण गाव साफ करोनि,Holi of village cleaning waste द्यावे पेटवूनी कैचन ते l l ग्रामगीतेतील या तत्वानुसार जिल्ह्यातील 20 गावात पर्यावरनाचा संदेश देत होळी आनंदात साजरी करण्यात आली, होळी म्हणजे ग्रामशुद्धीदिन श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारा ग्रामगीताप्रणित रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरण पूरक होळीचा सामूहिक कार्यक्रम अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असून यावर्षी 21 गावानी सहभाग दर्शविला,राष्ट्यसंताचे विचाराने प्रेरित असलेले सेवकराम मिलमीले यांचे संकल्पनातून नामदेव आस्वले गुरूजी यांचे पुढाकारातून नरेंद्र जीवतोडे यांचे मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.
आज 17 मार्चला, ग्रामसफाई करून कचऱ्याची होळीदहन,व व्यसनमुक्ती संकल्प कऱण्यात आला, यात भद्रावती तालुक्यातील चालबर्डी रै, घोडपेठ, लोणारा पा, चपराला गोरजा, कुडराला, घोंनाड,कोची,चरूर,भद्रावती , सागरा वरोरा तालुक्यातील बोर्डा, जामगाव खु, चंद्रपूर तालुक्यातील मोरवा,उर्जानगर, नागाला, तुकुम,चिंचाला, कोरपना तालुक्यातील भारोसा,कवठाला येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पुढाकारात जेष्ठ,युवा,महीला व बालक सहभागी झाली होती,विशेष म्हणजे घोडपेठ येथील 2 वर्षाच्या चिमुकलाबालक निहांश नितीन तेजने च्या ग्रामसफाईतील सहभागाने सर्वांचे लक्ष वेधले, या पर्यावरण पूरक होळी उपक्रमाने गुरुदेव प्रेमीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे,
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

1 comments:

  1. होळी म्हणजे ग्रामशुद्धी व धुलिवंदन म्हणजे प्रेमभाव, ग्रामगीतेतील ग्रामआरोग्य व सनोत्सवावर आधारित 20 गावाचा स्तुत्य उपक्रम

    ReplyDelete