Ads

कांग्रेस महानगर अध्यक्षाला भोवला महिलेचा नाद.

चंद्रपुर :-5 राज्यात झालेल्या विधानसभा –निवडणुकीत कांग्रेसने "लडकी हु लढ सकती हु" असे स्लोगण देत निवडणूक लढवली मात्र त्यात त्यांना यश प्राप्त झाले नाही.
त्या स्लोगण च्या विरोधात कांग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या चंद्रपूर महानगर अध्यक्ष कुणाल रामटेके यांनी काम केलं आहे.
एका विवाहित महिलेसोबत ओळखी करून व्हाट्सअप्प द्वारे प्रेमाचा आलाप करीत तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी शहर पोलिसांनी कलम 354 व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत रामटेके ला अटक केली.
एकीकडे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कांग्रेस नेहमी आवाज उचलण्याचे काम करतो तर दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते महिलांची छेड करताना दिसत आहे.
चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डात राहणाऱ्या फिर्यादी महिलेचा पतीसोबत वाद झाल्याने याबाबत महिला तक्रार निवारण केंद्रात समुपदेशनासाठी पाठविले.
फिर्यादी महिलेच्या नातेवाईकमार्फत कुणाल रामटेके यांची ओळख महिलेसोबत झाली, रामटेके यांनी स्वतःला तक्रार निवारण केंद्रातील कर्मचारी असल्याचे त्या महिलेसमोर दर्शविले व आता मी तुमचं समुपदेशन करण्यासाठी येणार असे सांगितले.
कुणाल रामटेके यांनी महिलेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तिला व्हाट्सअप्प द्वारे सतत प्रेमाचा आलाप करीत संदेश पाठविण्यात आले.
कुणाल रामटेके यांनी महिलेला प्रेमाच्या आकंठात बुडण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितला मात्र महिलेने रामटेके यांनी नकार दिला.
यानंतर रामटेके यांनी त्या महिलेला होकार देण्यास सांगितले अन्यथा महिला निराधार केंद्रात पाठविण्याची धमकी दिली.
रामटेके यांचं कृत्य आवाक्याबाहेर होताच महिलेने सरळ शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदवली.
कांग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षातील अनुसूचित जाती विभागाचे चंद्रपूर महानगर अध्यक्षा वर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली.
आधीच चंद्रपूर जिल्ह्यातील कांग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment