Ads

निराधारांना दरमहा तीन हजार रुपये मानधन द्या..

चंद्रपूर :- या महागाई च्या काळामध्ये संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार पेन्शन, श्रावणबाळ पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून जो एक हजार रुपयाची तुटपुंजी रक्कम मिळते ही रक्कम परवडण्यासारखी नसुन महिना 3 हजार रुपये मानधन द्या अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्ना दरम्यान केली.
संजय गांधी निराधार योजनेचे विधवा, घटस्फ़ोटीत महिला, अंध, अपंग, मुखबधीर, दुर्जर आजाराने ग्रस्त लोकांना तसेच, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थीना दरमहिना 3000/- ( तीन हजार रुपये ) मासिक वेतन देण्यात यावे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. त्याप्रमाणे दरवर्षी या पेन्शनमध्ये २० टक्के वाढ करण्याची आवश्यकता तसेच निराधार योजनेच्या पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाची अट २१ हजार रुपये आहे. ती वाढवून ६० हजार रुपये ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

त्यासोबतच लाभार्थ्यांना ५ तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात मानधन येणे अपेक्षित असते. मात्र २० तारीख येऊन देखील मानधन खात्यात जमा होत नसल्याचे दिसून येते. तात्काळ देण्याची मागणी यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत केली. यावेळी या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment