Ads

संत रामराव महाराजांच्या विचाराचे पालन करा-शेखर महाराज


जिवती :- संत सेवालाल महाराजाचे वशंज बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॕ.संत रामराव महाराज अन्नत्याग करून संपूर्ण आयुष्य समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा,बालविवाह,अंधश्रध्दा विरोधात समाज प्रबोधनाच्या माध्यमातून वैचारिक चळवळ उभी केली होती.त्यांचा विचाराचा वारसा समर्थपणे चालवावे असे अव्हान डाॕ.रामराव महाराज यांचे वशंज शेखर महाराज यांनी देवलागुडा येथील जगदंबा देवीच्या मंदिरासमोर घेण्यात आलेल्या भोग-भंडार कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.
देवलागुडा येथील जगदंबा देवीच्या मंदिरासमोर भोग-भंडार कार्यक्रम डाॕ.रामराव महाराज यांचे वशंज शेखर महाराज यांच्या हस्ते पार पडला.यावेळी गावातील नाईक अशोक जाधव,कारभारी पांडुरंग पवार,गजानन आडे,शंकर राठोड,रामचंद्र चव्हाण,गोविंद जाधव,कैलास जाधव,गजानन जाधव,पुजारी उत्तम जाधव सह गावातील संपूर्ण समाज बांधव उपस्थित होते.
बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॕ.रामराव महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या विचाराचा वारसा अविरतपणे चालविण्यासाठी.त्यांचे अधुरे स्वप्नं पुर्ण करण्यासाठी डाॕ.रामराव महाराज यांचे वशंज जिवती तालुक्यातील प्रत्येक तांड्या-तांड्यात जाऊन भोग-भंडाराचे आयोजन करून समाजाला दिशा देण्याचे कार्य हाती घेतले आहे.मागील तिन दिवसापासून तालुक्यात असलेल्या शेखर महाराज यांनी तांडा भेटीत आप-आपसातील हेवेदावे विसरून समाज एकता निर्माण करावी,वाईट व्यशन व सवयी दुर करून मुलांच्या शैक्षणिक भवितव्याकडे विशेष लक्ष देण्याचे अव्हानही तांडा भेटीत समाज बांधवाना करित आहे.जिवती,पेदाआसापूर,नगराळा,देवालागुडा,लोलडोह,सह विविध गावात तांडा भेट केली असून तालुक्यातील संपूर्ण तांड्यात भेटी देण्याचा त्यांचा मानस आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment