Ads

वीज कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे ऊर्जाभवन गेट समोर विघुत कायद्या-२०२१ व खाजगीकरणच्या विरोधात निदर्शने/व्दारसभा

ऊर्जानगर (चंद्रपूर):-महाराष्ट्र राज्य विघुत कर्मचारी,अभिंयते व अधिकारी राज्यस्तरीय संघर्ष समितीच्या वतिने संपूर्ण महाराष्ट्रभर द्वारसभा घेण्यात आली त्याच धर्तीवर चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या विज कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सी टी पी एस चंद्रपूर द्वारा सुधारित विघुत कायद्या-२०२१ ला विरोध,जल विद्युत केंद्र हस्तांतरण थांबविणे,देशात विज क्षेत्रांत होणारे खाजगीकरण थांबविणे,व्यवस्थापनाचे एकतर्फी धोरण विरोध इत्यादी मागण्याकरीता तसेच दि.२८ व २९ मार्च २०२२ ला होणाऱ्या दोन दिवसीय संप बाबत जनजागृतीसाठी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जाभवन गेट समोर दुसऱ्यांदा दि.२२.०३.२०२२ ला व्दारसभा घेण्यात आली.
या व्दारसभेला ग्रॅच्युएट इंजिनियर्स असोसिएशनचे केंद्रीय सचिव नवल दामले,महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेनेचे अध्यक्ष विक्की राठोड,सर्बोडिनेट इंजिनियर्स अशोसिएशनचे संयुक्त सचिव नितीन काळे ,विद्युत क्षेत्र तांत्रिक संघटनेचे सचिव सुनील भुयार, एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे ज्ञानेश्वर बोकडे ,महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे मिलिंद कोटरंगे,पावर फ्रंटचे केंद्रीय सरचिटणीस प्रदीप ढाले,अभय मस्के,असोसिएशन आफ केमिस्टचे पवनकुमार कुमावत,कंत्राटी कामगार संघटनेचे सीटुचे वामण बुटले व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मान्यवरांने विस्तृत संबोधित करून घोषणाबाजी केली.यावेळी दि.२८ व २९ मार्च २०२२ ला होणाऱ्या दोन दिवसीय संप बाबत सर्व कर्मचाऱ्यात जनजागृती करण्यात आली.या द्वारसभेला विशेष करून कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
या द्वार सभेचे सुञसंचालन महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस नरेंद्र रहाटे यांनी केले तर आभार अमोल मोंढे यांनी मानले या सभेला चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या संघटना संयुक्त समितीचे जयंत तायडे, हरीश रहाटे,अनिल दौडकर,देवराव कोंडेकर ,विजय भोयर,विजयसिंग राठोड ,कीर्तने साहेब,प्रकाश वाघमारे,रवींद्र पुसाम, सुरेश कुमरे,सुशील लांबट,राजेश आत्राम, दिलीप मोहोड व सर्व सघंटनाचे पदाधिकारी व सभासद ,कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment