Ads

‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट - हंसराज अहीर

चंद्रपूर :- काश्मिर खोऱ्यातील kashmir valley काश्मिरी पंडितावरील अत्याचाराचे, नरसंहाराचे वास्तविक The reality of atrocities and genocide on Kashmiri Pandits जिवंत चित्रण करणारा ’’दि कश्मिर फाईल्स’’ हा चित्रपट असल्याने प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयांनी हा चित्रापट बघावा असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हा चित्रपट प्रत्यक्ष बधितल्यानंतर केले आहे."The Kashmir Files" is a movie that every Indian should watch - Hansraj Ahir"The Kashmir Files" is a movie that every Indian should watch - Hansraj Ahir
हंसराज अहीर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत चंद्रपूरातील मिराज थिएटर मध्ये जावून दि 18 मार्च रोजी हा चित्रपट बघितला . या चित्रपटावर प्रतिक्रीया व्यक्त करतांना त्यांनी म्हटले की, जे काश्मिरी पंडित मुळ निवासी होते व ज्यांच्यामुळे काश्मिरची ओळख होती अशा लोकांना धर्मांध, कट्टरपंथी व राष्ट्रविरोधी मुस्लीम संघटनांनी हाकलून लावले. महिला, लहान मुले यांचा बळी घेतला, अमानुष अत्याचार केले तो काळाकुट्ट इतिहास निर्देशक, निर्मात्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यमान पिढीसमोर साकारलेला असल्याने प्रत्येक राष्ट्राभिमानी लोकांनी हा चित्रपट बघावा व या क्रूर घटनेचा खरा इतिहास जाणून घ्यावा अशी भावना अहीर यांनी व्यक्त केली.
या चित्रपटाला बघण्याकरीता शहरी लोकांबरोबरच ग्रामिण भागातील विविध क्षेत्रातील प्रेक्षकांची होणारी गर्दी हे या चित्रपटाचे मोठे यश आहे. दि 19 मार्च रोजी कोरपना तालुक्यातील बहुसंख्य महिला, पुरुष, व्यापारी, युवक, ज्येष्ठ नागरीकांनी हा चित्रपट बघण्याकरीता हजेरी लावली असता हंसराज अहीर यांनी गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलतांना हंसराज अहीर यांनी निर्मात्याबरोबरच या चित्रपटातील कलाकारांचे अभिनंदन केले. ते म्हणाले स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1990 मध्ये एवढा मोठा अत्याचार होतो परंतु यावर खुलेपणाने भाष्य होत नव्हते ते धाडस या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविल्या गेल. प्रधानमंत्राी नरेंद्र मोदी जीं सारख्या खंबीर नेतृत्वामुळे 370, 35ए कलम हटविल्या गेले असल्याने असला क्रुर प्रकार यापुढे कोणी करण्याची हिम्मत करणार नाही हे केंद्र सरकारचे फार मोठे यश आहे असेही अहीर यांनी म्हटले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment