Ads

आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली नगरसेवक नंदू नागरकर यांची भेट

चंद्रपुर:- अज्ञात युवकांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या नगरसेवक नंदू नागरकर यांची आज आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत प्रकृती बाबत माहिती घेतली आहे. तसेच आरोपींना तात्काळ अटक करा अशा सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
काल शुक्रवारी सकाळी मॉर्निग वाक वरून घरी परतत असतांना आझाद बागेजवळ दुचाकीने आलेल्या अज्ञात युवकांनी काँग्रेसचे माजी जिल्हा शहर कमिटी अध्यक्ष तथा मनपा नगरसेवक नंदू नागरकर यांची अडवणूक करत त्यांना क्रिकेट बॅटने जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी नंदू नागरकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत प्रकृतीची व प्रकरणाची माहिती जाऊन घेतली. एकाद्या लोकप्रतिनिधीवर अश्या प्रकारचा हल्ला होणे निंदनीय असल्याचे यावेळी ते म्हणाले, घटनेच्या 24 तासानंतरही आरोपी मोकाट आहे. याकडे पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, प्रकरणाच्या तपासात गती आणून आरोपींना तात्काळ अटक करावी अशा सूचनाही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment