Ads

शुक्रवारच्या सांजेला 'दिपमाळानी' उजळली प्राचीन बावड़ी

चंद्रपूर: बाबूपेठ येथील मराठा चौकस्थित गोंडकालीन ऐतिहासिक बावडी- विहीर येथे इको-प्रोतर्फे शुक्रवार, दिनांक 4 मार्च रोजी 'स्वतंत्र्याच्या च्या अमृत महोस्तव' निमित्त विशेष मोहिम राबवित 'आपला वारसा, आपणच जपुया' या उपक्रम अंतर्गत प्राचीन विहिरी संवर्धन संदेश दिला.

आज सायंकाळी या बावड़ीवर 'दिपोत्सव' साजरा करीत प्राचीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाकरिता संदेश देण्यात आला. यासोबतच शहरातील अन्य प्राचीन विहिरिच्या संवर्धन कड़े लक्ष वेधन्यात आले. सध्या राज्यभर 'महाराष्ट्र बारव मोहिम' राबविन्यात आली. इको-प्रो च्या 'आपला वारसा, आपणच जपुया ' या उपक्रम व मोहीमेंअंतर्गत शिवरात्रीपूर्वीपासून प्राचीन ऐतिहासिक बावड़ी स्वच्छता करण्यात आली. चंद्रपूर शहरात अनेक पुरातन वास्तू येथे आहेत. गोंडकालीन विहिरी स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून, नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. यावर मोठी-मोठी झाडे उगवल्याने विहिरीची तुटफुट होत असल्याची ही बाब लक्षात आल्याने, आणि कचरा फेकन्यात आल्याने इको-प्रो ने यापूर्वी सुद्धा तीन वेळा विहिरीची सफाई केली आहे. यंदा सुद्धा मागील चार-पाच दिवसात विहिरिच्या भिंतीतून निघालेले अनावश्यक झाडे कापण्यात आली. पायऱ्यांची स्वच्छता करून पाण्यातील घाण काढण्यात आली. प्राचीन विहिरीची स्वच्छता कार्य पूर्ण झाल्यावर या प्राचीन वारसा संवर्धन विषयी व्यापक जनजागृती व्हावी म्हणून, यावर 'दिप' लावून दिपोत्सव' साजरा करण्यात आला.
सदर विहिरीचे संरक्षण व संवर्धन करिता, या पाण्याच्या नागरिकड़ून वापर व्हावा याकरिता सदर विहिरिस जाळी लावणे, पाणी उपसा करणे व जनजागृती फलक लावण्याकरिता स्थानिक प्रशासन कड़े मागणी लावूण धरली असल्याचे इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सांगितले असून परिसरात नागरिकांना सुद्धा आवाहन केले आहे.

हात लगे निर्माण में, युवकांनी पुढे यावे
म्हणत इको-प्रो च्या माध्यमाने आजच्या युवा पिढीला पर्यावरण, वन-वन्यजीव, पुरातत्व वास्तु संवर्धन, रक्तदान, आपातकालीन व्यवस्थापन आदि क्षेत्रासह ऐतिहासिक वास्तु संवर्धन करिता युवकांना प्रेरित करीत 'श्रमदान' मधून संस्था कुठलेही आर्थिक सहाय्य न घेता ही सर्व कामे करीत आहेत, यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन इको-प्रो कडून करण्यात आले आहे. चंद्रपूर ऐतिहासिक पर्यटन विकास करिता स्थानिकाचा सहभाग महत्वाचा आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment