Ads

राजकारणात बेधडक निर्णय घेत यशस्वी झालेले व्यक्तिमत्त्व- विलासजी विखारब्रम्हपुरी :-राजकारणात प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते कारण राजकारणात घेतला गेलेला एक निर्णय काही राजकारण्यांचा नशीब चमकवतो तर काही राजकारण्यांना मातीमोल करून टाकतो. मात्र राजकारणात रिस्क घेत बेधडकपणे निर्णय घेत यशस्वी झालेले ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे विद्यमान काॅंग्रेसचे गटनेता तथा बांधकाम सभापती विलासजी विखार यांचा राजकीय प्रवास मात्र अनेकांना अचंबित करणारा आहे.
४ मार्च १९७७ या वर्षी ब्रम्हपुरी नजीकच्या कुर्झा येथे जन्माला आलेले विलास विखार हे एका अल्पभूधारक कुटुंबात जन्माला आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कसेबसे त्यांनी ११ व्या वर्गापर्यंत शालेय शिक्षण घेतले. घरात आई-वडील, १ बहीण, १ भाऊ असा कुटुंब असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी विलास विखार यांनी २ वर्ष पानठेला चालवला. काही काळ त्यांनी मुलांना कराटेचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर १९९४ ते १९९९ या वर्षात त्यांनी कमांडर चालवली. तेव्हा राज्यात शिवसेना पक्षाचा झंझावात सुरू होता. त्यामुळे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ते शिवसेनेसोबत जोडले गेले. व त्यांनी शिवसेनेचे कुर्झा येथील शाखाप्रमुख म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्यांना शिवसेनेचे ब्रम्हपुरी शहर प्रमुख जबाबदारी देण्यात आली. पक्षात त्यांनी आपले पाय मजबूत रोवले. लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भुमिका घेत त्यांनी लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. लोकांच्या प्रश्नांसाठी झटतांना त्यांच्यावर फौजदारी गुन्हे सुध्दा दाखल झाले. मात्र ते पुढे चालत राहिले. व २००४ या वर्षी ते विक्रमी मते घेत पहिल्यांदा नगरसेवक झाले.

२००५ मध्ये चिमुर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे तत्कालीन आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना पक्षातुन काॅंग्रेस पक्षात घेतला. तेव्हा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विलास विखार यांनी सुध्दा काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
२००६ ते २००८ या वर्षात त्यांनी न.प. बांधकाम सभापती पद सांभाळले. त्यानंतर २००९ मध्ये ते पुन्हा नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य झाले. २०१४ या वर्षी मध्ये त्यांनी जेलमध्ये राहुन निवडणूक लढवली. तेव्हा अवघ्या ४ मतांनी ते पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा त्यांनी २०१९ मध्ये नगरपरिषदेचे निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. नगरपरिषदेवर काॅंग्रेसची सत्ता आल्याने पक्षाने त्यांना काॅंग्रेसचे गटनेता व न.प. बांधकाम सभापती पद दिले. तेव्हा पासून आजतागाhयत ते त्या पदावर कायम आहेत. त्यांच्या हा राजकीय प्रवास अनेकांनी जवळुन बघितला आहे. राजकारणात त्यांनी घेतलेली रिस्क व बेधडक निर्णय हे त्यांच्या यशाचे रहस्य आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment