Ads

काँग्रेस नेते नगरसेवक नंदू नागरकर याच्यावर अज्ञात युवकांचा जीवघेणा हल्ला.

चंद्रपुर :-
जीवघेणा हल्ला झालाय पाळतीवर असलेल्या 3 युवकांनी काँग्रेस नेते नगरसेवक नंदू नागरकर (corporator Nandu Nagarkar) यांच्यावर हल्ला केला. नागरकर यांची दैनंदिनी माहीत असल्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरकर यांना दुचाकीस्वारांनी भर चौकात क्रिकेट बॅटने मारहाण (Beaten with a cricket bat) केली. तोंडावर मास्क घातलेल्या या युवकांनी आधी मुद्दाम गाडी आडवी घातली. मग अकारण भांडण उकरून काढत मराठी सिटी शाळा चौकात मारहाण केली. हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले. नागरकर काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष ( former city president of Congress)- माजी स्थायी सभापती आणि विद्यमान नगरसेवक आहेत. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत चर्चांना उत आलाय. या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केलाय.

हल्लेखोरांनी तोंडावर घातला होता मास्क
नंदू नागरकर नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले. त्यांच्यासमोर तीन हल्लेखोर दुचाकीने आले. त्यांनी नंदू यांचा रस्ता अडवला. मराठी सिटी शाळा चौकात ही घटना घडली. हल्लेखोरांनी मास्क घातले होते. त्यामुळं त्यांना ओळखता आले नाही. हे हल्लेखोर कोण आहेत, हे अद्याप समजले नाही.
मारहाण करताना या हल्लेखोरांनी क्रिकेटच्या बॅटचा वापर केला. याचा अर्थ हल्लेखोर हे क्रिकेट खेळणारे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातो. मारहाण केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नंदू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक कराचंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी
चंद्रपूर : काँगेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक नंदू नागरकर हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी ४ मार्चला आझाद बाग परिसरात सकाळी फिरायला आले होते. त्यानंतर ते घरी जात असताना काही युवकांनी रस्त्यात अडवून त्यांना मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना निंदनीय आहे. या घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास करून हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. या संबंधीचे निवेदन चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना सादर करण्यात आले आहे.

एखाद्या लोकप्रतिनिधीवर भरदिवसा असे हल्ले होत असतील, तर शहरातील सर्वसामान्य जनता खरचं सुरक्षित आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी नंदू नागरकर यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अन्यथा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष पप्पू सिद्दीकी, एनएसयुआयचे कुणाल चहारे, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, नौशाद शेख, कासिफ अली यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.


नगर सेवक नंदू नागरकर यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी
काँग्रेसचे माजी शहर कमेटी अध्यक्ष तथा मनपा नगर सेवक नंदु नागरकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाचा निषेद करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक विभागाचे युथ अध्यक्ष राशेद हुसेन, प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, घूग्घूस शहर संघटक विलास वनकर, शहर संघटक करणसिंह बैस, शहर संघटक रुपेश पांडे, शहर संघटक राम जंगम आदिंची उपस्थिती होती.
सकाळी मॉर्निंग वॉक वरुन घराकडे परत येत असतांना आजाद बागेजवळ दुचाकीवर आलेल्या अज्ञात युवकांनी काँग्रेसचे नगर सेवक नंदू नागरकर यांच्यावर क्रिकेट बॅट आणि हॉकी स्टिकने प्राणघातक हल्ला केला. यात नंदु नागरकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचे आता तिव्र पडसाद उमटत असून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्याण या घटनेचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही निषेध करण्यात आला असून हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या बाबत त्यांच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक अरिवंद साळवे आणि शहर पोलिस निरिक्षक सुधाकर अंभोरे यांना निवेदनही देण्यात आले आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment