Ads

बाबूपेठ येथील सोनामाता बावडी विहिरीची इको-प्रो कडून श्रमदानातून स्वच्छता मोहिम


चंद्रपूर: बाबूपेठ येथील मराठा चौकस्थित गोंडकालीन ऐतिहासिक बावडी- विहीरीची स्वच्छता इको -प्रो च्या पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात आली.

इको-प्रो च्या 'आपला वारसा, आपणच जपुया ' या उपक्रम व मोहीमें अंतर्गत शिवरात्रीपूर्वीपासून प्राचीन ऐतिहासिक बावड़ी स्वच्छता करित दीपोस्तव साजरा करण्यात येणार आहे. शिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी 'महाराष्ट्र बारव मोहिम' अंतर्गत इको-प्रो सदस्य अभय अमृतकर व अन्य स्थानिक सदस्याच्या मदतीने स्वच्छता करीत 'दिप' लावण्यात आलेले होते. मात्र स्वच्छता अभियान सुरु असल्याने त्यास व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने शुक्रवार, 4 मार्चला येथे प्राचीन विहिरिवर "दीपोस्तव" साजरा करण्यात येणार आहे. रोज सकाळी बाबुपेठ परिसरात गोंडकालीन विहीर विशेष मोहीम राबवून स्वच्छ करण्यात येत आहे.

चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून, अनेक पुरातन वास्तू येथे आहेत. गोंडकालीन विहिरी स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून, नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. मात्र, काही नागरिकांकडून विहिर कचरा फेकण्यात येतो. यावर मोठी-मोठी झाडे उगवल्याने विहिरीची तुटफुट होत असल्याची ही बाब लक्षात आल्याने इको-प्रो ने यापूर्वी तीन वेळा विहिरीची सफाई केली आहे, यात महानगरपालिका ने सुद्धा सहकार्य केले आहे. मात्र कोविड समस्येमुळे मागील दोन वर्षात या विहिरीवर जाळी लावण्याचे कार्य पूर्ण होउ शकले नाही. यासाठी परत महानगरपालिकाकड़े पाठपुरावा करण्यात येणार आहे. यादृष्टीने इको-प्रो ने परत विशेष अभियान राबवित आहे. मागील चार-पाच दिवसात विहिरिच्या भिंतीतून निघालेले अनावश्यक झाडे कापण्यात आली. पायऱ्यांची स्वच्छता करून पाण्यातील घाण काढण्यात आली. सोनामाता मंदिरजवळील विहीर स्वच्छ करण्यात आली आहे. यावेळी इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी 'आपला वारसा, आपणच जपूया' या उपक्रमाअंतर्गत सहभागी समाजकार्य विभाग चे विद्यार्थी जे अभ्यासक्रम अंतर्गत इको-प्रो संस्थेसोबत सहभाग घेत आहेत यांना मार्गदर्शन केले. आजच्या स्वच्छता अभियान मधे बंडू धोतरे, अभय अमृतकर, संजय सब्बनवार, मनीष गावंडे, सुनील पाटिल, कुणाल देवगिरकर, राजू काहीलकर, प्रितेश जीवने, कपिल गोन्नाडे, धर्मेंद्र लुनावत, ओम वर्मा यांचेसह समाजकार्यमहविद्यालयचे विद्यार्थी सहभागी होते.

शुक्रवारी प्राचीन विहीर 'उजळून' निघणार

प्राचीन विहिरीची स्वच्छता कार्य पूर्ण झाल्यावर या प्राचीन वारसा संवर्धन विषयी व्यापक जनजागृती व्हावी म्हणून, यावर 'दिप' लावून 'दिपोस्तव' साजरा करण्यात येणार आहे. स्थानिकांच्या मदतीने रांगोळी काढून, फुलानी सजवून, दिप प्रज्वलित केले जाणार आहे. यापुढे यात कचरा टाकूण अस्वच्छ होणार नाही, येणाऱ्या पर्यटकना या प्राचीन विहिरी पाहता यावी याकरिता व्यापक प्रयत्न केले जाणार आहे, परिसरात जनजागृती केली जाणार आहे.

या प्राचीन विहिरी म्हणजे शहरातील मुख्य "जलस्त्रोत"
या विहिरी फक्त प्राचीन-ऐतिहासिकच नाहीतर शहरातील अश्या ठिकाणी आहेत जिथे पाण्याची समस्या दूर होऊ शकते, बाबुपेठ-सोनामाता परिसर मधील विहिरीला जिवंत 'झरे' नजरेस दिसून येतात. शहरात अन्य ठिकाणी असलेल्या विहिरीना भर उन्हाळ्यात सुद्धा, मोठ्या प्रमाणात पाणी असते. या विहिरीवर नागरिकाकरीता सोय करून यावर जाळी बसविण्याचे कार्य होणे आवश्यक आहे.
शहरातील प्राचीन विहिरीना 'नवसंजिवनी' देण्याची गरज
इको-प्रो आपले पर्यावरण व स्थानिक वारसा जतन करण्यास कार्य करीत आहे, यात स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांनी पुढाकार घेतल्यास याबाबत भरीव कामे केली जाऊ शकतात. आपला ऐतिहासिक वारसा जतन करीत, जलस्त्रोताचे संरक्षण करणे आवश्यक आहे. अलीकडे सार्वजनिक विहिरीची निर्मिती अशक्य आहे. आहे तो वारसा आणि जलसंवर्धन अश्या दुहेरी बाब यामुळे शक्य असल्याने यावर त्वरित कार्य केले जाणे अपेक्षित असल्याचे मत इको-प्रो चे बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment