Ads

महिला काँग्रेस महिला दिनानिमित्त राबवणार "महिला दिन सप्ताह"

Women's Congress to launch "Women's Day Week" on the occasion of Women's Day
चंद्रपुर :-दरवर्षी महिलादिन येतो पण महिलादिन का साजरा केला जातो?? वर्षभर अनेक दिवस असतात तसाच एक दिवस असतो महिलादिन, मग त्यादिवशी काय वेगळं असत?? याची कोणतीही माहिती सामान्य महिलांना नसते. वर्षातून एक दिवस कधीतरी कार्यक्रम घेतले जातात महिलांना बोलवून सत्कार केला जातो इतकेच महिला दिनाचे औचित्य आहे का?? असे अनेक प्रश्न मनात दरवर्षी निर्माण होतात.

म्हणूनच महिला दिनाचे औचित्य साधून महिला काँग्रेस तर्फे महिला दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अनेक भागात हा सप्ताह महिला काँग्रेस तर्फे साजरा करण्यात येणार आहे. काँग्रेस च्या जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी आणि त्या भागातील श्रमिक महिलांचा सत्कार या निमित्ताने करण्यात येणार आहे.
महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात हा सप्ताह राबवण्यात येणार आहे.

अनेक महिला पक्षाशी जोडल्या जातात पण नंतर कालांतराने त्यांची सक्रियता नाहीशी होते अशा महिलांच्या भेटी या निमित्ताने घेऊन त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिला दिवस का साजरा केला जातो या संबंधीचे मार्गदर्शन देखील महिलांना करण्यात येणार आहे. दरवर्षी मोठाले कार्यक्रम अनेक संघटना घेतात अनेक महिलांचे सत्कार करतात पण श्रमिक महिला अशा कार्यक्रमात फार येत नाही कारण वर्षभर त्यांना मोल मजुरी करावी लागते म्हणून अशा महिलांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन महिला काँग्रेस च्या पदाधिकारी करणार आहेत त्यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा देखील करणार आहे अशी माहिती नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिली.

आज महिला दिन सप्ताहाची सुरवात अष्टभुजा वॉर्ड मधून करण्यात आली यावेळी बसंती रायपुरे या घरकाम करणाऱ्या महिलेचा साडी चोळी व झाड देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनीता धोटे, सेवा फाऊंडेशन काँग्रेस च्या शहर अध्यक्ष शितल कातकर, महिला सेवादल काँग्रेस च्या शहर अध्यक्ष लता बारापात्रे, मंगला शिवरकर, वाणी डारला, हर्षा चांदेकर, किरण वानखेडे,छाया ताई, शैलजा पंजा, ज्योती पंजा, सुमित्रा अटकूलवार गुडीया लोधी, सुनीता मेश्राम, झिंगा बाई काकडे, सुनीता निलावार, बेबी साहू, रेखा साहू , कुंती पंडित यांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment