Ads

पाण्यातून मार्गक्रमण करतांना महिला पाण्यात वाहून गेली

ब्रह्मपुरी: वैनगंगा नदी पात्रातील पाण्यातून पायदळ मार्गक्रमण करून शेतीवर जात असतांना तालुक्यातील पिंपळगाव (खरकाडा) येथील महिला पाण्यात वाहून The woman was swept away in the water while navigating through the water गेल्याची घटना दिनांक १४ मार्च रोजी सोमवारला सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली. गिताबाई हरिदास भरै वय (५५) असे वाहून जाणाऱ्या महिलेचे नाव आहे.
सध्या रब्बी पिकाचा हंगाम परिसरात सुरू आहे सदर महिलेचे शेत वैनगंगा नदीपलीकडे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोंडाळा गावाच्या शेतशिवारात असल्याने शेतात पेरलेली मोट, उडीद लाख लाख लाखोळी खोदण्यासाठी पिंपळगाव इथून वैनगंगा नदीच्या पाण्यातून आठवडाभरापासून मार्गक्रमण करून येणे-जाणे करीत होती. या अगोदर वैनगंगा नदीला पाणी कमी होते मात्र काल रात्रीपासून गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. वाढलेल्या पाण्याचा अंदाज बहुतेक सदर महिलेला आला नाही त्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर घटनेची तक्रार ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन येथे नोंदविण्यात आली असून वृत्त लिहिस्तोपर्यंत वाहून जाणारी सदर महिला काही लोकांना गांगलवाडी टी पॉईंट जवळील वैनगंगा नदी पुला जवळून वाहून जाताना दिसून आल्याची सांगण्यात आल्याने सदर महिलेची शोध घेण्यासाठी चंद्रपूर येथून बोटीला पाचारन करण्यात आले असून तोपर्यंत पोलिसांकडून बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरूच आहे मात्र तब्बल 48 घंटे होऊनसुद्धा मृतदेह अद्यापही हाती लागला नाही
घटनेचा तपास ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment