Ads

कृत्रिम अंगांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल – आ. किशोर जोरगेवार

The life of a cripple will get a new direction through artificial limbs - Kishor Jorgewar
चंद्रपुर :- हात आणि पाय हे मानवी शरीराचे प्रमुख अवयव आहे. त्यामुळे जन्मतः किंवा अपघातात हे अवयव निकामी झाल्याने मिळालेल्या दिव्यांगत्वामुळे अनेकांच्या आयुष्यात निराशेचा काळोख निर्माण झाला आहे. मात्र आता पंजाबी सेवा समितीचा कृत्रिम अंग artificial limbs वितरणाचा हा उपक्रम दिव्यांग बांधवांसाठी नवी आशा निर्माण करणारा असून या कृत्रिम अंगाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.The life of a cripple will get a new direction through artificial limbs - Kishor Jorgewar

पंजाबी सेवा समितीच्या Punjabi seva samiti वतीने चंद्रपुरातील कबीर नगर येथे दिव्यांगांना कृत्रिम अंगाचे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंजाबी सेवा समितीचे अध्यक्ष अजय कपूर, नारायण सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भैया, आय.पी.पी. विक्रम शर्मा, पंजाबी सेवा समितीचे सचिव भगवान नंदवानी, पंजाबी सेवा समितीचे उपाध्यक्ष सुरेश शर्मा, पंजाबी सेवा समितीचे भूतपूर्व अध्यक्ष किशनकुमार चढ्ढा, पंजाबी सेवा समितीचे भूतपूर्व अध्यक्ष कुक्कु सहानी आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, पंजाबी सेवा समितीच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. याचा समजालाही मोठा उपयोग होत आहे. कोरोना काळात पंजाबी सेवा समितीच्या वतीने करण्यात आलेली नागरिकांची सेवा सामाज कधीही विसणार नाही. कोनोराच्या पाहिल्या लाटेत नागरिक भयभीत असतांना पंजाबी सेवा समितीतेने गरीब गरजूंसाठी भोजन व्यवस्था केली. आता त्यांच्या वतीने दिव्यांगांना कृत्रिम अंगाचे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील महत्वाचा घटक असलेल्या दिव्यांगांना कृत्रिम हात आणि पाय उपलब्ध करून देत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम या पंजाबी सेवा समितिने केले आहे. या उपक्रमातून दिव्यांगाना मिळालेला आनंद अवर्णनीय असाच आहे. त्यांना यातून नवीन जीवन मिळणार आहे. हरवलेला आनंद परत मिळणार आहे. जगण्याची नवी उभारी मिळणार आहे. असे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले तसेच यापुढेही पंजाबी सेवा समितीच्या माध्यमातून समाजाला उपयोगी असे उपक्रम राबविले जातील अशी आशाही यावेळी बोलतांना त्यांनी व्यक्त केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment