Ads

गोंडपीपरी ठाणेदाराने फिर्यादी वयोवृद्ध महिलेच्या कानशिलात वाजवली .

चंद्रपूर :-
महिला दिनी अनेक नामवंत व ग्रामीण भागातील महिलांचा सन्मान करण्यात येतो, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात महिला दिनानंतर अजब प्रकार घडला, 10 मार्च ला गोंडपीपरी शहरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये राहणाऱ्या जिजाबाई तुमडे यांचा नयन तुमडे, अनुसया तुमडे यांचेशी वाद झाला.
तुमडे यांच्या घराजवळील शेण खड्ड्यात काही कोंबड्या मरण पावला यावरून नयन तुमडे व अनुसया तुमडे यांनी जिजाबाई यांना तुम्ही विषप्रयोग करीत आमच्या कोंबड्याना मारलं असा आरोप लावला.
या आरोपावरून तुमडे परिवाराचा वाद वाढला व नंतर मारहाण झाली.
सदर प्रकरण गोंडपीपरी पोलीस स्टेशनमध्ये पोहचले असता, पोलिसांनी दोघांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केले.
जिजाबाई यांनी नयन व अनुसया तुमडे यांचेवर कारवाई करण्याची ठाणेदार राजगुरू यांचेकडे मागणी केली मात्र ठाणेदार राजगुरू यांनी काही न ऐकता 60 वर्षीय जिजाबाईला police inspector manhandled wrongly old women तू जास्त माजली, तुझी चरबी उतरवितो असे म्हणत जिजाबाईच्या कानशिलात लावली, त्यानंतर ठाणेदार राजगुरू यांनी शिपायाला बोलावीत या बाईला पट्ट्याने मार असा आदेश दिला.
त्या शिपायाने जिजाबाईच्या पायावर व मांडीवर पट्ट्याचा मार दिला.Inhuman beaten
असा थेट आरोप जिजाबाई तुमडे यांनी ठाणेदार राजगुरू यांचेवर पत्रकार परिषदेत केला.Press Confrence
महिला दिनानंतर महिलेवर स्वतः ठाणेदाराने वृद्ध महिलेला केलेल हे मारहाण प्रकरण ठाणेदाराला न शोभणारे आहे.
पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस शिपाई असताना त्यांनी महिलेवर हात उगारण कितपत योग्य आहे? How appropriate it is for them to lay hands on a woman असा प्रश्न पत्रकार परिषदेत त्या महिलेने केला.
जिजाबाईच्या आरोपावर ठाणेदार राजगुरू यांनी स्पष्टीकरण देत मारहाणीचे आरोप फेटाळून लावले, तुमडे यांचा जो वाद झाला होता त्यावेळी मी दोघांना समज देत परत पाठविले त्यादिवशी अशी कोणती घटना घडली नाही, जिजाबाई यांचा आरोप चुकीचा आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment