चंद्रपूर:- आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन द्वारा डॉ. पंकज कुलसंगे यांचा आरोग्य क्षेत्रातील संशोधन व सामाजिक कार्यातील योगदाना बद्दल याची दखल घेण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून डॉ. कुळसंगे यांनी सामाजिक बंधीलकीतून शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली कोरोना सारख्या जागतिक महामारीत खेडया-पाड्यावर तसेच जंगलातील गावातील नागरिकांना आरोग्य सेवा वेळेवर देऊन अनेकांचे प्राण वाचविले या कार्याची दखल घेऊन त्यांना डॉ रणजीत पाटिल माजी गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संतनगरी शेगाव येथे aima विदर्भ गौरव पुरस्कार-२०२२ देवुन सम्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार सोहळ्याला मुख्य अतिथि मा. ना. डॉ राजेंद्र शिंगने अन्न व औषधि प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.प्रवीन जोशी संचालक (एम.एस.एम.ई), मा.आमदार आकाश फुंडकर, मा. आमदार संजय कुटे प्रमुख अतिथि म्हणून उपस्तिथ होते. तेव्हा डॉ. कुळसंगे यांना मिळालेल्या पुरस्कारासाठी त्यांचे अभिनंदन केल्याजात आहे.
Subscribe to:
Post Comments
                            (
                            Atom
                            )
                          

0 comments:
Post a Comment