चंद्रपुर :-चंद्रपूरकर व इरई बचाव जनआंदोलनाच्या दाताळा पूल ते हडस्ती पर्यन्त इरई नदीच्या खोलीकारण -रुंदीकरण व बंधारे बांधण्याच्या मागणी विरुद्ध मोठया थाटात दि.4 एप्रिल 2022 रोजी पडोली रेल्वे पूल येथे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत खोलीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जनतेच्या हडस्ती पर्यन्तच्या मागणी विरोधात चोरारा पुला पर्यंत फक्त 7 किलोमीटर खोलीकरणासाठी 6 कोटी निधी खर्च करण्यात येणार होते. दाताळा पूल ते आरवट पूल हा दाट लोकवस्तीचा भाग असून 2006 व 2013 आलेल्या महापुरात याच भागाला खुप जास्त फटका बसला होता उलट नदीचे खोलीकरण झाले नसल्याने व गर्भगृहात पाणी मुरत नसल्यामुळे उन्हाळ्यात याच नदी लागतच्या भागात विहीर-नळकुपात पाणी येत नसल्याने भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना आजही करावा लागत आहे.जर 18 दिवसात मुंगीच्या गतीने फक्त 100 फूट लांब गाळ काढली जात असेल तर 7 किलोमीटर लांब गाळ काढण्यासाठी किती वर्ष लागेल याचे उत्तर जलसंपदा विभागाच्या मंद चालीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना द्यावा. त्यांच्या मुंगी चालीच्या कार्याने इरई नदीच्या पुराचा फटका अर्ध्या चंद्रपूरकरांना बसल्यास जे हवामान खात्याने वर्तविलेल्या सरासरी पावसाच्या अंदाजाने खरे ठरण्याची संभावना आहे त्याकरिता प्रशासन जिम्मेदार राहील. 4 पोकलंड,2 बुलडोजार मशीन,10 मोठे आयवा ट्रक त्यांच्या कळे उपलब्ध सर्व सामुग्रीचा उपयोग करून पावसाळ्या पूर्वी आरवट पुला पर्यन्त खोलीकारण -रुंदीकरणाचे कार्य जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी इरई बचाव जनआंदोलनाचे संयोजक कुशाब कायरकर यांनी केली आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment