Ads

टाटा एस व दू चाकी च्या समोरा समोर धडकेत ग्रामसेवक जागीच ठार.

सिंदेवाही :- शहरापासून जवळच पाथरी रोड वरील शासकीय आयटीआयच्या जवळ झालेला भीषण अपघातात  terrible accident सरडपार गुंजेवाही येथील ग्रामसेवक रामकृष्ण इरपाते यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की सरडपार येथील ग्रामसेवक रामकृष्ण शामराव इरपाते वय 40 वर्ष रा. मेंडकी ता. ब्रह्मपुरी यांच्याकडे गुंजेवाही येथील ग्रामपंचायत ग्रामसेवकाचा प्रभार होता. ग्रामसेवक रामकृष्ण इरपाते हे गुंजेवाही वरून युनिकॉन दुचाकी क्रमांक एम एच 34 ए डब्ल्यू 64 53 या गाडीने येत असताना टाटा एस ऑटो क्रमांक एम एच 36 एफ 931 या गाडीला जोरदार समोरा समोर धडक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. Gram Sevak was killed on the spot in a head-on collision between a Tata S and a two-wheeler. अपघाताचे घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश घारे व त्यांचे चमू तात्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करीता सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले .घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती येथील कर्मचारी व ग्रामसेवक बघण्याची दवाखान्यात गर्दी केली होती सदर घटनेची पुढील चौकशी पोलीस स्टेशन करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment