घुग्घुस :- शहरात सध्या सहा ही वॉर्डांत भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झालेली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भीषण अश्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
मागील पाच सहा दिवसांपासून शहरातील अनेक वॉर्डांत नळा तून होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद असल्याने पिण्याच्या पाण्यापासून ही नागरिक वंचित झाले आहे.
शहरात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस अध्यक्ष रजुरेडडी हे आपल्या दोन ते तीन खाजगी टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा करीत आहे.
पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश लक्षात घेत शहरातील उद्योगां तर्फे पाणी टँकर सुरू करावे अशी मागणी रेड्डी यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ.अर्शिया जुही यांना केली होती सदर मागणीला यश आले असून लॉयड्स मेटल्स, एसिसी कंपनी,वेकोली तर्फे एक - एक टँकर सुरू करण्यात आले आहे.
मात्र अजून ही शहराची पाणी समस्या दूर झाली नसल्याने आज काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने राजुरेडडी यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांची भेट घेऊन पाणी समस्येवर चर्चा केली व समस्या निवारणसाठी कडक अंमलबजावणीच्या सूचना दिल्या याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दांतलवार, मोसिम शेख,इर्शाद कुरेशी, रोहित डाकुर,देव भंडारी, बालकिशन कुळसंगे,कपिल गोगला,सुनील पाटील, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
0 comments:
Post a Comment