Ads

माजी राज्यमंत्री अंब्रिशराव आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाने केली गोळी झाडून आत्महत्या

अहेरी :-माजी राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे माजी पालकमंत्री अंब्रिशराव आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या Suicide by security guard केल्याची घटना घडली आहे. त्याने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली Suicide by shooting with revolver . ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास राजे अंम्ब्रीशराव यांच्या अहेरी येथील रुक्मिणी महल' या बंगल्याच्या आवारात घडली.

हितेश भैसारे (अंदाजे 37 वर्ष) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून ते अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात पोलीस नायक म्हणून कार्यरत होते. रुक्मिणी महल येथे कर्तव्यावर असताना त्यांनी आपल्या छातीवर गोळी झाडून घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ते तिथेच कोसळून मरण पावले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान भैसारे यांनी घरगुती कारणातून आत्महत्या केल्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment