Ads

पोलिसांच्या ताब्यात असलेला लाचखोर पोलिसाने केला आत्महत्येचा प्रयत्न

राजुरा प्रतिनिधी :-राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील लाच प्रकरणातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक आरोपी राजेश त्रिलोकवार याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या ताब्यातून निसटुन रात्री 10:10 मिनिटांनी नगर पालिकेच्या जवळच्या राजुरा तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर आरोपी पोलिसाने लघवीच्या बहाण्याने पळ काढून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

प्रस्तुत प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन आले. माहिती घेतली असता सदर आरोपी पोलिसाला वाचविण्यात यश घटनास्थळी अनेक पोलीस उपस्थित असुनही त्यांना त्रिलोकवार ह्यांना बाहेर काढणे जमले नाही मात्र शहरातील युवक मंगल चव्हाण ह्याने हिंमत दाखवुन तलावात उडी घेतली व त्रिलोकवार ह्यांना तलावातून बाहेर काढण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या ताब्यात असलेला आरोपी पोलीस ठाण्यातून पळून आत्महत्या करायला गेलाच कसा हा प्रश्न असुन ताब्यातील व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी ठरल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment