Ads

१७ हजार ५०० रुपयांची सापडलेली रक्कम केली परत

कोरपना :- अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कॉलॉणीत गॅस सिलेंडरच्या गोडाऊन कडे जात असतांना दोन युवकांना प्लास्टिक मध्ये असलेली १७ हजार ५०० रुपयांची रक्कम रस्त्याच्या बाजूला पडलेली आढळली त्यात त्या दोन्ही युवकांनी क्षणाचा विलंब न करता रस्त्याच्या कडेलाच पोस्ट ऑफिस लागून असल्याने तेथील कुणाचे तरी रक्कम पडली असावी असा त्यांना अंदाज आला आणि त्यांनी पोस्ट ऑफिसच्या मॅनेजर सोबत बोलून ती रक्कम ज्याची आहे त्याला मिळाली पाहिजे साहेब म्हणत परत केली * 17,500 found and returned
ही घटना आहे कोरपना तालुक्यातील नांदा गावातील योगेश बंडू नांदेकर व गौरव बंडू वरारकर ह्या दोन युवकांनी आपला प्रामाणिक पणा दाखविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे दोघेही शिक्षण घेत असलेले विद्यार्थी असून योगेशने १२ वी परीक्षा दिली असून यांच वय १८ वर्ष आहे गौरव हा इंजिनिअरिंग ला प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे विद्यार्थी व तरुणच या देशाचं भवितव्य आहे असे म्हटल्या जाते ते यांनी आपल्या प्रमाणिकतेपणातून सिद्ध करून दाखविले आहे . Appreciation of youth's honesty everywhere

योगेश नांदेकर यांचे वडील मागील महिन्याभर्यापूर्वी कॅन्सर सारख्या आजाराने मृत पावले असून घरची परिस्थिती अत्यन्त हलाखीची असतांना सुद्धा त्यांच्या मनात लोभाची किव्हा स्वार्थाची भावना मनात आली नाही याच्या कुटुंबातील एकप्रकारची स्वाभिमानाची शिकवण असावी


सध्या धावपळीच्या जगात कोणीच कोणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यातही प्रामाणिकपणा कुठेतरी हरवताना दिसत आहे. मात्र, अशी काही माणसं आहेत, ती आजही प्रामाणिकपणे ह्या जगात वावरताना दिसत आहे. मात्र, त्यांची दखल घ्यायला कोणाकडेही वेळ नाही, परंतु अशी माणसं निस्वार्थपणे आपलं काम करतच आहेत.

आज बहुतांश लोक रस्त्यावरती पैसे दिसले की, लागलीच खिशात टाकतात. मात्र, काहीजण याला अपवाद आहे.
नांदा येथील योगेश बंडू नांदेकर व गौरव बंडू वरारकर या युवकांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे

इमानदारीने परत केल्याने त्यांचा निस्वार्थीपणा यातून आपल्याला दिसून येता. आज आपण वेळोवेळी म्हणत असतो की, माणुसकी संपली आहे आणि याचा प्रत्येयही आपल्यालाही अनेक प्रसंगातून येतो यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल माणुसकी अजून शिल्लक असल्याची जाणीव होते.humanity still alive
पोस्ट ऑफिस कार्यलयात कामानिमित्त गेलो असता माझ्याकडून रक्कम कसे पडले लक्षातच आले नाही मात्र घरी आल्यानंतर माझ्या लक्षात आले की माझी रक्कम कुठंतरी पडली तसाच मी कार्यलयाच्या दिशेने निघालो तिथे जाऊन विचारपूस केली तर मॅनेजर साहेबांनी खात्री करून तुमच्याच गावातील मुलांनी रक्कम परत दिली आहे घेऊन जा या दोघांचे मी मनापासून आभार मानतो आणि योगेश व गौरव च्या प्रामाणिकपणाचे तोंड भरून कौतुक करतो यांच्यामुळे माझे पैसे मला परत मिळाले
शंकर निवलकर
नांदा
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment