Ads

शासकीय आश्रम शाळा चिंधीचक येथे गुढीपाडवा निमित्त शाळा प्रवेश अभियान..

नागभीड :- नागभीड तालुक्यातील मौजा- चिंधीचक येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमुर यांच्या सूचनेनुसार आज आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय आदिवासी आश्रम शाळा येथे गुढीपाडव्याचे निमित्ताने "शाळा प्रवेश अभियान" राबविण्यात आले. या अभियानात शाळेत शासकीय आश्रम शाळेतील प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या मुख्यत्वे 1 ते 4 अत्यंत कमी असल्याने ती वाढवण्याचे दृष्टीने सन 2022-23 करिता 02/04/2022 पासून शाळा प्रवेश अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानअंतर्गत शासकीय शाळेच्या 10 ते 20 किमी चे परिसरात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य असून परिसरातील सरपंच,पोलीस पाटील,ग्रा.पं.सदस्य,अंगणवाडी शिक्षिका,बचत गट,युवा मंडळ यांचे सहकार्याने शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थी संख्या वाढवण्यात यावी असे सांगण्यात आले.

शाळा प्रवेश अभियान सभेच्या प्रसंगी
मा.एम.एन.आकुलवारसर मुख्याध्यापक शा.आ.शाळा चिंधीचक,मा.जगदीश सडमाके भाजपा तालुका महामंत्री नागभीड,सौ.सुष्माताई खामदेवे पं.स.सदस्य नागभीड,छगन कोलते सरपंच किटाळी बोर.,उमाजी खोब्रागडे सरपंच गोविंदपूर,वैशाली गायधने सरपंच जनकापूर,प्रदीप समर्थ उपसरपंच चिंधीचक,प्रदीप धारणे पो.पा.चिंधीमाल,माधुरीताई दडमल अंगणवाडी सेविका,डी.पी.सहारे सर तसेच शासकीय माध्य.आश्रमशाळा चिंधीचक येथील शिक्षकवृंद तथा चतुर्थ कर्मचारी वृंद,परिसरातील प्रतिष्ठित गावकरी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment