Ads

शासकीय अधिकाऱ्यांना 'प्रोटोकॉल 'चे विस्मरण...?

चंद्रपुर :-राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या नेत्याची किंवा लोकप्रतिनिधींचा अपमान करण्याची प्रथा मागील काही वर्षा पासून रूढ झाली आहे.त्यामुळे संधी मिळताच अपमान केला जातो,व नंतर 'तो मी न्हवेच'ची भूमिका घेतली जाते.कधी कार्यक्रमात निमंत्रण करून तर कधी निमंत्रीत न करता अपमान केल्या जातो.असाच काहीसा प्रकार येथील लोकप्रतिनिधींच्या बाबतीत घडत आहे.काही दिवसांपूर्वी मनपाने पालकमंत्री वडेट्टीवार,खा सुरेश धानोरकर,आ.जोरगेवार यांचे नाव पत्रिकेत टाकले नाही.मनपा प्रशासनाला खाली बघावे लागले.आता शासनाच्या जल संपदा विभागाने आ. किशोर जोगेवार यांना अध्यक्षस्थानी निमंत्रित करून अपमानित केले आहे.विशेष म्हणजे त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत उद्घाटक,विशेष अतिथी,प्रमुख अतिथी,यांचे नंतर प्रकाशित करण्यात आले आहे.तर महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांचे नाव 7 व्या क्रमांकावर ठेवले आहे.या घोषित व अघोषित अपमान शृंखलेस जवाबदार कोण...?शासकीय अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलचे विस्मरण का होत आहे..?* Government officials forget 'protocol' ...? * यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी येथील भारतरत्न अबुल कलाम आझाद बागेचा लोकार्पण सोहळा पार पडला.मनपा प्रशासनाने पहिल्यांदा प्रकाशित केलेल्या पत्रिकेतून पालकमंत्री,खासदार व आमदारांचे यांचे नाव गायब केले.राजशिष्टाचार नुसार शासकीय निधीतून झालेल्या कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधींचे नाव असायला हवे.मनपाच्या या प्रकाराने आ जोरगेवार संतप्त झाले.त्यांनी 'मी येणारच'या आशयाचे फलक लावून व जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार केल्यावर पत्रिका बदलण्यात आली.ही पत्रिका मनपा स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी स्वतः जोरगेवारांना दिली.तरीही नंतर आ.जोरगेवार व त्यांच्या यंग चांदा ब्रिगेडने गोंधळ घातला.

आता जलसंपदा विभागाचा उपद्रव
जलसंपदा विभागाने येत्या 4 एप्रिलला इरई नदी गाळ उपसा व स्वच्छता कार्यक्रमाचा शुभारंभ सोहळा आयोजित केला आहे.या कार्यक्रमाच्या पत्रिकेत विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.मुनगंटीवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष आ किशोर जोरगेवार यांचे नाव राजशिष्टाचार(प्रोटोकॉल) protocol नुसार नसल्याने याक्स विषयाची चर्चा होत आहे.जलसंपदा विभागाच्याOf water resources department या उपद्रवामूळेDue to nuisance प्रशासनिक अधिकाऱ्यांना झाले तरी काय..?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment